33 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
घरअर्थजगतओलाकडून चार्जिंग केंद्रे उभी करण्यासाठी ५० शहरांची चाचपणी

ओलाकडून चार्जिंग केंद्रे उभी करण्यासाठी ५० शहरांची चाचपणी

कंपनी लवकरच इ-स्कूटर कारखाना काढणार; ५० शहरात विविध ठिकाणी चार्जिंग केंद्रे चालू करणार

Google News Follow

Related

टॅक्सी प्रवासासाठी लोकप्रिय झालेली ओला कंपनी देशभरातल्या ५० विविध शहरांतील मोक्याच्या जागी चार्जिंग केंद्रे उभारण्याच्या विचारात आहे. त्यादृष्टीने कंपनीने विविध शहरांची चाचपणी सुरू केली आहे.

बंगळूरू स्थित ओला कंपनीने नुकताच तामिळनाडू सरकारशी राज्यातील पहिला इ-स्कूटर कारखाना स्थापन करण्यासाठी करार केल्याचे कळले आहे. भारतासोबत युरोपातील विविध शहरांची देखील चाचपणी सुरू असल्याचे कळले आहे. अशा तऱ्हेने दोन्ही खंडातील विविध शहरात चार्जिंग केंद्रे चालू करून जागतिक पातळीवर चार्जिंग केंद्रांचे जाळे उभे करू इच्छित आहे. 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ओलाच्या स्कूटर मधील बॅटरी ही बदलता येण्यास योग्य अशी आहे. त्यामुळे चार्जिंग केंद्रांची उपलब्धता ही चार्जिंगशी निगडीत इतर समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने योग्य ठरतील. ओला कंपनीला याबाबत पाठवलेल्या इ-मेलला अजून कोणतेही उत्तर प्राप्त झालेले नाही. मात्र तरीही येत्या काही महिन्यात विविध प्रकारच्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात उतरवण्यासाठी कंपनी कसून प्रयत्न करत असल्याचे कळले आहे. 

₹२,४०० कोटींची गुंतवणूक करणार

येत्या वर्षभराच्या काळात ओलाचा नवा स्कूटर कारखाना चालू होणे अपेक्षित आहे. त्यासाठी कंपनी ₹२,४०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे सुमारे १०,००० रोजगारांची निर्मीती होईल. पूर्ण क्षमतेने चालू झाल्यानंतर वार्षिक २ दशलक्ष स्कूटर उत्पादनाची क्षमता असलेला हा जगातील सर्वात मोठा स्कूटर निर्मीती कारखाना असेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा