अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्धच्या मोठ्या कारवाईत महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय युनिटने कोलंबोहून मुंबईत आलेल्या एका महिला प्रवाशाकडून तब्बल ४.७ किलो कोकेन जप्त केले आहे. या कोकेनची बेकायदेशीर बाजारपेठेतील किंमत तब्बल ४७ कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे.
डीआरआयला मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (सीएसएमआयए) आगमन होताच संशयित महिलेला अडवून तिच्या सामानाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान नऊ कॉफी पॅकेट्समध्ये लपवलेले पांढऱ्या पावडरीचे नऊ पाउच आढळून आले. फील्ड टेस्ट किटच्या तपासणीत या पावडरीत कोकेन असल्याचे स्पष्ट झाले.
महिला प्रवाशाला ताब्यात घेतल्यानंतर पुढील तपासात या तस्करीच्या व्यवहारात सामील असलेल्या आणखी तीन जणांना अटक करण्यात आली. एकूण पाच जणांना एनडीपीएस (नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स) कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
बिहार: पंतप्रधान मोदींनी ‘गमछा’ फिरवला, ‘मोदी-मोदी’च्या घोषणेने परिसर दुमदुमला!
संजय राऊत प्रकृतीच्या कारणास्तव दोन महिने सार्वजनिक जीवनातून बाहेर
एअर इंडियाला १०,००० कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची आवश्यकता!
“विकसित बिहारसाठी एनडीए सरकारची आवश्यकता”
या प्रकरणामागील मोठे आंतरराष्ट्रीय तस्करी नेटवर्क उघडकीस आणण्यासाठी तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. “देश नशामुक्त करण्यासाठी आणि अंमली पदार्थांच्या साखळ्या पूर्णपणे खंडित करण्यासाठी डीआरआय कटिबद्ध आहे,” असे संस्थेच्या अधिकाऱ्याने सांगितले.







