28 C
Mumbai
Monday, September 14, 2026
घरक्राईमनामाछोटा राजनच्या नावाने ११ कोटींची खंडणी मागणारी टोळी गजाआड

छोटा राजनच्या नावाने ११ कोटींची खंडणी मागणारी टोळी गजाआड

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई

Google News Follow

Related

कुख्यात गँगस्टर छोटा राजनच्या नावाने एका विकासकाकडे तब्बल ११ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचून पाच जणांना रंगेहाथ अटक केली आहे. वांद्रे (पश्चिम) येथील एका पुनर्विकास प्रकल्पातील विकासकाला छोटा राजन गँगच्या नावाने धमकावून ११ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती आरोपींनी पहिल्या हप्त्यापोटी २५ लाख रुपयांची मागणी केली. घाबरलेल्या विकासकाने तातडीने मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार नोंदवली.

तक्रारीची गंभीर दखल घेत खंडणी विरोधी पथकाने आरोपींना पकडण्यासाठी एक धाडसी सापळा रचला. पोलिसांनी २५ लाख रुपयांच्या रोख रकमेऐवजी एका बॅगेत ‘चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडिया’च्या बनावट नोटांचे ५० बंडल भरले. बॅग पूर्णपणे खऱ्या नोटांनी भरलेली दिसावी यासाठी पोलिसांनी बंडलच्या वरच्या आणि खालच्या बाजूला खऱ्या ५०० रुपयांच्या नोटा लावून हुबेहूब देखावा तयार केला.
हे ही वाचा:
उबर करणार ३३०० नोकरकपात

प्रवेश नाकारल्यामुळे कूपर रुग्णालयात बुरखा घातलेल्या महिलेचा गोंधळ

विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद जाणार? याचिका न्यायालयाने फेटाळली

राम मंदिराच्या सीईओपदी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा

ठरल्याप्रमाणे आरोपी २५ लाख रुपयांची पहिली रक्कम स्वीकारण्यासाठी आले असता, दबा धरून बसलेल्या खंडणी विरोधी पथकाने त्यांना बॅग ताब्यात घेताच रंगेहाथ बेड्या ठोकल्या. या कारवाईत पोलिसांनी डॅनियल स्टीव्हन, एथेल स्टीव्हन, नझीर शेख, अब्दुल्ला खान आणि रेमी फर्नांडिस या पाच जणांना अटक केली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या त्यांच्या इतर साथीदारांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

आरोपींनी केवळ दहशत निर्माण करण्यासाठी छोटा राजनच्या नावाचा वापर केला होता की त्यांचे प्रत्यक्षात अंडरवर्ल्डशी काही संबंध आहेत, या दिशेने पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा