बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग प्रकरणासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस आमदार के.सी. वीरेंद्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध छापे टाकले. गुरुवारी (९ ऑक्टोबर) ईडीने चालक्करा येथील दोन लॉकरमधून अंदाजे ५०.३३ कोटी रुपयांचे ४० किलो २४ कॅरेट सोन्याचे बार जप्त केले.
ही कारवाई पीएमएलए २००२ (मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदा) अंतर्गत बेंगळुरू झोनल ऑफिसकडून करण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणात एकूण १५० कोटींपेक्षा जास्त मूल्याची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये यापूर्वी २१ किलो सोने, रोख रक्कम, दागदागिने, लक्झरी वाहने आणि बँक खाती जप्त केले आहेत.
ईडीच्या तपासानुसार, के. सी. वीरेन्द्र, त्यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीयांनी “King567” आणि “Raja567” यांसारखे अवैध ऑनलाइन सट्टा प्लॅटफॉर्म्स चालवले. या प्लॅटफॉर्म्सद्वारे लोकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा करण्यात आले आणि त्यांची फसवणूक करण्यात आली.
ही सगळी आर्थिक उलाढाल फोन पैसा सारख्या पेमेंट गेटवेच्या माध्यमातून “म्यूल अकाउंट्स” मध्ये वळवण्यात आली. हे अकाउंट्स विविध सामान्य लोकांच्या नावे बनवले गेले, ज्यांना त्यासाठी किरकोळ रक्कम दिली जात होती. देशभरात अशा प्रकारचे अनेक खातेधारक वापरण्यात आले, ज्यांचा संबंध इतर ऑनलाइन घोटाळे आणि सायबर क्राईमशीही असल्याचे उघड झाले आहे.
या ऑनलाइन सट्टा नेटवर्कचा एकूण टर्नओव्हर २००० कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे हा देशातील सर्वात मोठ्या सट्टा घोटाळ्यांपैकी एक ठरतो. या अवैध कमाईचा वापर परदेश दौरे, व्हिसा खर्च, लक्झरी हॉटेल्समध्ये वास्तव्य, मार्केटिंग, वेबसाइट होस्टिंग यासाठी करण्यात आला. हे सर्व खर्चही म्यूल अकाउंट्सद्वारेच करण्यात आले, जेणेकरून पैशाचा माग काढणे शक्य होणार नाही.
ED conducted searches in the K C Veerendra illegal online betting case, seizing 40 kg gold worth Rs. 50.33 crore from Challekere lockers. Total assets seized so far exceed Rs. 150 crore. Investigation revealed Veerendra, an MLA, and associates ran betting sites like King567,… pic.twitter.com/Yj3i9vD2JK
— IANS (@ians_india) October 9, 2025
हे ही वाचा :
गाझामध्ये युद्धबंदी लागू, इस्रायली सैन्याची माघार सुरू!
आमीर खान मुत्तकी भारतात, ख्वाजा आसिफ म्हणतायत आम्ही रोज सैनिकांचे अत्यंसंस्कार करतोय…
पाक संरक्षण मंत्री म्हणतात, “अफगाणी भारताशी नेहमीच एकनिष्ठ राहिलेत”
‘जस्सू’ बनून हिंदू मुलीला फसवणाऱ्या सोहेलला बजरंग दलाने पकडले!
के. सी. वीरेन्द्र यांना ऑगस्ट २०२५ मध्ये अटक करण्यात आली होती आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार, अलीकडील छाप्यांचा उद्देश या संपूर्ण सट्टा नेटवर्कच्या आर्थिक स्रोतांचा आणि ऑपरेशन्सचा शोध घेणे हा आहे. ईडीने स्पष्टपणे सांगितले की त्यांच्याकडे ठोस पुरावे आहेत जे दाखवतात की सट्टा प्लॅटफॉर्मवरून मिळालेले पैसे हेराफेरी करून लक्झरी खर्च आणि मोठ्या रकमेच्या व्यवहारांमध्ये वापरण्यात आले.







