उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एका अल्पवयीन दलित मुलीवर अत्याचाराचा प्रकार समोर आला आहे. चार मुस्लीम तरुणांनी एका १४ वर्षांच्या मुलीचे अपहरण केले आणि तिच्यावर तब्बल दोन महिने सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासोबतच आरोपींनी मुलीच्या हातावर असलेले ‘ओम’ चिन्ह पुसण्यासाठी त्यावर अॅसिड ओतले. यापेक्षाही भयंकर म्हणजे, जेव्हा जेव्हा पीडित अल्पवयीन मुलगी काही खायला मागायची तेव्हा आरोपीकडून तिला जबरदस्तीने गोमांस खायला दिले जायचे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत अल्पवयीन मुलीवर दोन महिने अत्याचार सुरु होता. पीडित मुलीच्या मावशीने या प्रकरणाची तक्रार भगतपूर पोलिस ठाण्यात केली. यानंतर, पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध कलम १३७(२), ७०(१), १२३, १२७(४), २९९, ३५१(३), १२४(१), पोक्सो कायद्याच्या कलम ५ आणि ६ आणि एससी/एसटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सलमानला अटक केली आणि इतरांचा शोध सुरू आहे.
पीडितेच्या मावशीने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिच्या मेहुणीची १४ वर्षांची मुलगी २ जानेवारी २०२५ रोजी शिंपीकडून कपडे शिवण्यासाठी बाजारात जात होती. वाटेत, गावातील तरुण सलमान, जुबैर, रशीद आणि आरिफ यांनी तिला जबरदस्तीने गाडीत ओढले. यानंतर, तिला मादक पदार्थाचा वास देऊन बेशुद्ध करण्यात आले. जेव्हा मुलगी शुद्धीवर आली तेव्हा ती एका खोलीत होती आणि तिच्या अंगावर कपडे नव्हते. आरोपीने तिच्यावर त्याच खोलीत दोन महिने सामूहिक बलात्कार केला.
हे ही वाचा :
१०६ बळी घेणाऱ्या पक्षाच्या मांडीवर बसल्याबद्दल ठाकरेंनी हुतात्मा चौकात माफी मागावी!
अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये होळी कार्यक्रमाला परवानगी नाकारली
उद्धव ठाकरे, चिता कॅंपची भाषा कोणती?
तहव्वूर राणाची तंतरली, म्हणतो, भारतात पाठवू नका, छळ करून मारतील!
तक्रारीनुसार, मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिचा खूप शोध घेण्यात आला, पण शोध लागला नाही. ३ जानेवारी रोजी पोलिसांकडे तक्रार केली, मात्र कोणतीही खबर मिळाली नाही. यानंतर, पिडीत मुलगी कशीबशी २ मार्च रोजी घरी पोहोचली. जेव्हा घरी पोहोचली तेव्हा तिची प्रकृती खूपच वाईट होती.
घरी आल्यानंतर तिने संपूर्ण प्रकार सांगितला. अन्न मागितले तर आरोपी गोमांस खायला द्यायचे, नकार दिल्यानंतर जबदस्तीने खायला द्यायचे असे पिडीत मुलीने सांगितले. तसेच हातावर बनवण्यात आलेला ‘ओम’ नावाच्या टॅटूवर आरोपींनी अॅसिड ओतून पुसून टाकले आणि चेहऱ्यावर अॅसिड ओतण्याची धमकीही दिल्याचे पिडीत मुलीने सांगितले. दरम्यान, यावर एसपी ग्रामीण कुंवर आकाश सिंह म्हणाले की, या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे.