एअर इंडियाच्या विमान AI-३७९ ला थायलंडमधील फुकेत येथे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. या विमानाला बॉम्बची धमकी मिळाली होती. हे विमान फुकेतहून नवी दिल्लीला येत होते. बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. फुकेत विमानतळ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
एअर इंडियाच्या विमान AI-३७९ मध्ये सुमारे १५६ प्रवासी होते. शुक्रवारी (१३ जुन) सकाळी ९:३० वाजता या विमानाने उड्डाण केले, परंतु २० मिनिटांनी आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. भारतीय वेळेनुसार सकाळी ११:३८ वाजता हे लँडिंग झाले. त्यानंतर शोध मोहीम राबवण्यात आली. कारवाईनंतर अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमानात कोणताही बॉम्ब सापडला नाही. सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत, कोणालाही दुखापत झाली नाही.
दरम्यान, १२ जून रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले. आतापर्यंत २६५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यापैकी २४१ जण विमानात प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. मृतांमध्ये ५ जण विमान कोसळलेल्या वैद्यकीय वसतिगृहातील आहेत. दुपारी १:३८ वाजता सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमान कोसळले. राज्याचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील या विमानात होते.
हे ही वाचा :
अहमदाबाद विमान अपघात: पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘हे शब्दात वर्णन करता येणार नाही’
टिकलं तर लाडकं नाहीतर कच्चं मडकं |
आधी धमकी दिली, मग साखरेसाठी वाडगा पुढे केला…
डोंबिवलीत शस्त्रसाठयासह दोघाना अटक, एटीएसची कारवाई
विमान कोसळलेल्या बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात ५० हून अधिक लोक उपस्थित होते. एमबीबीएसचे ४ विद्यार्थी आणि एका डॉक्टरच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, विमानात असलेल्या २४२ प्रवाशांपैकी १६९ भारतीय नागरिक होते. यामध्ये ५३ ब्रिटिश, १ कॅनेडियन आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते. या दुर्घटनेतून एक प्रवासी सुखरूप बचावला.
Reuters reports that, "an Air India flight from Thailand's Phuket to India's capital New Delhi received a bomb threat on Friday and made an emergency landing on the island, airport authorities said." pic.twitter.com/iMwR2DOTci
— ANI (@ANI) June 13, 2025







