28 C
Mumbai
Monday, September 7, 2026
घरदेश दुनियानेपाळच्या पुरात वाहून गेलेल्या बँकेच्या तिजोरीत सापडले ५० कोटींचे सोने

नेपाळच्या पुरात वाहून गेलेल्या बँकेच्या तिजोरीत सापडले ५० कोटींचे सोने

नेपाळमधील बँकेची तिजोरी गेली होती वाहून

Google News Follow

Related

नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुराने मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महापुराच्या पाण्यात बँकेची तिजोरीच वाहून गेली होती. या तिजोरीत तब्बल ५० कोटी रुपयांचं सोनं आणि सुमारे दीड कोटी रुपयांची रोकड असल्याचं समोर आलं आहे. पूर ओसरल्यानंतर मलबा हटवताना ही तिजोरी आणि त्यातील मौल्यवान वस्तू सापडल्या. ही तिजोरी रासुवा परिसरातून वाहून गेल्यानंतर त्रिशूली नदीच्या प्रवाहासोबत पुढे गेली आणि धादिंग जिल्ह्यातील भागात आढळून आली. महापुरामुळे तिजोरी बँकेच्या ठिकाणाहून दूर वाहून गेल्याचं सांगण्यात आलं आहे.

तिजोरी सापडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी ती उघडण्याचा प्रयत्न केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. याप्रकरणी पोलिसांनी २९ जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात नेपाळी चलन जप्त करण्यात आलं आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, महापुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तिजोरीतील सोनं आणि इतर मौल्यवान वस्तूंची एकूण किंमत सुमारे ५० कोटी रुपये असल्याचं वृत्त आहे. या संपत्तीचा नेमका मालक आणि तिजोरी कोणत्या बँकेची होती, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून पडताळणी सुरू आहे.

हे ही वाचा:

पाण्याखालील मोहिमांसाठी नौदल सज्ज; स्वदेशी ‘निपुण’ ताफ्यात दाखल

मोदी-पाशिनयान भेटीने भारत-अर्मेनिया संबंधांना नवी दिशा

काँग्रेस मंत्री बसवराज म्हणतात, हजला जाण्याची इच्छा, पण धर्मांतरित व्हावे लागेल!

दुर्घटनेनंतर चीन – नेपाळ यांच्यात ‘तू तू मैं मैं’

नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. रस्ते, पूल, घरं आणि इतर पायाभूत सुविधा वाहून गेल्या आहेत. पुराच्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात माती आणि मलबा वाहून आल्याने बचावकार्यही आव्हानात्मक ठरत आहे. ताज्या अहवालांनुसार, ८०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून ४ हजारांहून अधिक जण अद्याप बेपत्ता आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा