उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी देशासह जगभरातून लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. दोन दिवसांपूर्वीच भाविकांच्या संख्येने ५० कोटींचा आकडा पार केला होता. गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमात पवित्र स्नान घेण्यासाठी म्हणून लोक प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. मिळेल त्या मार्गाने आणि वाहतुकीच्या साधनाने हे भाविक महाकुंभ मेळ्यासाठी येत आहेत.
भाविक रस्ते, रेल्वे, हवाई अशा जमेल त्या मार्गाने प्रयागराजमध्ये दाखल होत असतानाचं आता दिल्लीतील एका पिता आणि पुत्रीच्या जोडीने प्रयागराज गाठण्यासाठी निवडलेल्या मार्गाची चर्चा सर्वत्र होत आहे. संगमपर्यंत पोहोचण्यासाठी या जोडीने ट्रेन किंवा बसचा पर्याय न घेता सायकलचा पर्याय निवडला आहे. पिता- पुत्रीची ही जोडी थेट दिल्लीहून सायकलने प्रयागराजला पोहोचली आहे. दोघांनी सायकलवरून तब्बल ६७५ किमी अंतर कापले आणि त्रिवेणी संगमात डुबकी घेत स्नान केले.
अनुपमा पंत आणि त्यांचे वडील उमेश पंत हे दोघे दिल्लीचे रहिवासी आहेत. या दोघांनीही सायकलने ६७५ किमीचा प्रवास पूर्ण करून त्रिवेणी संगम गाठले आहे. त्यांनी केवळ सायकलने प्रवास केला नसून यातून एक सामाजिक संदेशही देऊ केला आहे. वडील आणि मुलगी या दोघांनीही लोकांना सायकलिंगचा संदेश देऊ केला आहे. दोघांचाही असा विश्वास आहे की सायकलिंग अनेक समस्या सोडवते आणि आरोग्य देखील चांगले राहते.
हेही वाचा..
महाकुंभच्या सेक्टर ८ मधील कॅम्पमध्ये लागली आग!
हनुमान चालिसा म्हणणाऱ्या भक्तांवर दगडफेक
बांगलादेश: मुस्लीम जमावाचा हिंदू दुकानावर हल्ला, दुर्गा मूर्तीची केली तोडफोड!
समय रैनाला इशारा, प्रत्यक्ष जबाब द्या, ऑनलाइन नाही!
सामान्य लोकांना सायकलिंगच्या फायद्यांची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने ही जोडी सायकलने संगमाकडे निघाली होती. आपला प्रवास यशस्वी पूर्ण करताच त्यांनी संगमात स्नान केले. अनुपमा आणि तिच्या वडिलांनी सांगितले की, जर बहुतेक लोक त्यांच्या कामासाठी सायकलने जास्त प्रवास करत असतील तर त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या सोडवता येतील. ते म्हणतात की, सायकलने प्रवास केल्याने केवळ शरीर निरोगी राहत नाही तर आपले मन देखील निरोगी राहते. या उपक्रमाद्वारे, वडील आणि मुलीने लोकांना सायकल चालवण्याची प्रेरणा दिली आहे.