30 C
Mumbai
Friday, September 17, 2021
घरधर्म संस्कृतीप्रथम तुला वंदितो...देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह

प्रथम तुला वंदितो…देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह

Related

आजपासून देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही विघ्नहर्ता गणरायाच्या उत्सवावर कोविडचे सावट असले तरीही भाविकांच्या उत्साहात बिलकुल कमतरता झालेली नाही. देशभरातील गणेशभक्त, घरगुती गणपती, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे यांनी बाप्पाच्या या सोहळ्यात कसलीही कमतरता ठेवलेली नाही. राज्यात मुंबई, पुणे या शहरांमध्ये गणेशोत्सवात जमाव बंदी लावण्यात आली आहे. पण तरीही राज्याच्या विविध भागातून नागरिक दर्शनासाठी येताना दिसत आहेत.

गणेशोत्सव म्हटलं की कोकण पट्ट्यात चांगलाच उत्साह पाहायला मिळतो. प्रति वर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो चाकरमानी हे आपल्या कोकणातल्या मूळ गावी गणेशोत्सवासाठी परतले आहेत. या नागरिकांची सोय व्हावी यासाठी केंद्र सरकारतर्फे विशेष रेल्वेही सुरू करण्यात आल्या आहेत. तर एसटी महामंडळातर्फेही विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

हुश्श…अखेरची कसोटी आजपासूनच खेळली जाणार

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली

महिला पोलिस शिपायानेच काढला आपल्या पोलिस सहकाऱ्याचा ‘काटा’

प.बंगालमधील भाजपा खासदाराच्या घराबाहेर कुणी फेकले क्रूड बॉम्ब?

आजपासून सुरू झालेल्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान मोदी यांनी देखील समस्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरच्या माध्यमातून राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कोविड विरोधात सुरु असलेल्या आपल्या प्रयत्नांना विघ्नहर्ता यश देवो अशी प्रार्थना राष्ट्रपतींनी केली आहे.

तर मोदींनी मराठीमध्ये ट्विट करत ‘आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, सौभाग्य आणि आरोग्य घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया!’ असे म्हटले आहे

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,408अनुयायीअनुकरण करा
3,030सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा