घरधर्म संस्कृतीधुळ्यात हिंदूंचा जनसागर लोटला!

धुळ्यात हिंदूंचा जनसागर लोटला!

हिंदूत्ववादी संघटनांतर्फे भव्य जनआक्रोश मोर्चा

धुळे शहरातील श्रीराम मंदिरात असलेल्या मूर्तीची विटंबना काही समाजकंटकांनी केली होती. या घटनेच्या निषेधार्थ शनिवार, १० जून रोजी धुळे शहरात हिंदूत्ववादी संघटनांतर्फे भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले. भाजपासह अन्य राजकीय पक्षांच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सकाळी धुळे शहरातील चाळीसगाव रोड‎ चौफुलीजवळील छत्रपती शिवाजी महाराज ‎यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच राम मंदिरात आरती करून मोर्चाला सुरूवात झाली. एका रथामध्ये राम, सीता, लक्ष्मण यांच्या मूर्ती ठेवत हा मोर्चा काढण्यात आला आहे. धुळ्यात काही अनपेक्षित घटना घडू नये म्हणून मोर्चावर पोलिस करडी नजर ठेवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मोर्चाच्या बंदोबस्तासाठी जवळपास ५०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच, आज हिंदू संघटनांकडून धुळे बंदचेही आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या शहरात तणावपूर्ण स्थिती आहे.

हे ही वाचा:

शरद पवारांनी भाकरी फिरवली; कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेलांची वर्णी

धुळ्यात अनधिकृत टिपू सुलतान स्मारक रात्री उशिरा हटविले

सादरीकरणावेळी मंचावरचं भरतनाट्यम गुरु श्री गणेशन यांचे निधन

पालखी मार्ग, वारकऱ्यांची विश्रांती स्थाने, पाण्याची व्यवस्था उत्तम राखा!

धुळे शहरात झालेल्या कथित मूर्ती विटंबना प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला मोठया संख्येने कार्यकर्त्यांसह नागरिक उपस्थित होते. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील सर्व दुकाने व्यवसायिकांनी बंद ठेवण्यात आली होती. मोर्चात आक्षेपार्ह घोषणा देणाऱ्यांवर‎ पोलिसांची नजर असणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version