29 C
Mumbai
Monday, June 27, 2022
घरधर्म संस्कृतीज्ञानवापी मशिदीतील शिवलिंगाचा नवा व्हीडिओ व्हायरल

ज्ञानवापी मशिदीतील शिवलिंगाचा नवा व्हीडिओ व्हायरल

Related

ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भात सध्या न्यायालयात प्रकरण प्रलंबित असले तरी एक नवा खुलासा यानिमित्त समोर आला आहे. एका व्हीडिओच्या माध्यमातून या मशिदीतील शिवलिंग, मंदिराचे खांब, मूर्ती व त्रिशुळाकार हे दिसते आहे.

या व्हीडिओच्या माध्यमातून या मशिदीतील शिवलिंग दिसत असून त्यात मध्यभागी एक छिद्र करण्यात आल्याचेही स्पष्ट होते. याच व्हीडिओत मशिदीतील जुन्या मंदिराचे खांबही दिसत आहेत. या खांबाची रचना एखाद्या हिंदू मंदिराप्रमाणे आहे. या परिसरातील भिंतींवर व मंदिराच्या खांबावर स्वस्तिक, त्रिशूळ, डमरू, घंटा, पानांचे आकार, कलश अशी हिंदू धर्मातील चित्रे दिसत आहेत.

वाराणसीच्या काशी विश्वेश्वर मंदिराच्या परिसरात ही ज्ञानवापी मशिद आहे. ती मशिद नसून ते मंदिर असल्याचा दावा केला जात आहे. जिल्हा कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार मशिदीचा सर्व्हे करण्यात आला. त्यात शिवलिंग असल्याचा दावा हिंदू पक्षातर्फे करण्यात आला तर हे शिवलिंग नसून कारंजे असल्याचा दावा मुस्लिम पक्षाकडून करण्याता आला.

हे ही वाचा:

आव्हाडांसाठी पोलिसाने कारचालकाला लगावली थप्पड

‘आप’चे दिल्लीतील आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची ईडीने गठडी वळली

सिद्धू मुसवाला यांच्या हत्येमागे गँगस्टर गोल्डी ब्रार

राकेश टिकैतवर शाईफेक

 

सध्या हा संपूर्ण परिसर न्यायालयाच्या देखरेखीखाली आहे. पण आतील भागाचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल झाला आहे. जिथे वजूखाना असे म्हटले जाते तिथे हे शिवलिंग आहे. या मशिदीतील खांबांची रचना मंदिरासारखीच आहे.

या परिसरातील तळघराचे चार दरवाजे बंद आहेत, ते उघडण्याची मागणी हिंदू पक्षकारांनी केलेली आहे. यात केंद्राने आता हस्तक्षेप करावा अशीही मागणी हिंदू पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,937चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
11,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा