27 C
Mumbai
Thursday, December 1, 2022
घरधर्म संस्कृतीलखनौमध्ये आता फक्त 'रावणा'लाच जाळणार, 'मेघनाद, कुंभकर्णा'ची सुटका

लखनौमध्ये आता फक्त ‘रावणा’लाच जाळणार, ‘मेघनाद, कुंभकर्णा’ची सुटका

लखनौमध्ये बदलणार ३०० वर्षांची परंपरा

Google News Follow

Related

दरवर्षी दसऱ्याला रावणासोबत कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या प्रतिकृतीही जाळल्या जातात. पण लखनौमध्ये ३०० वर्षांपासूनची ही परंपरा आता संपुष्टात येणार आहे. ऐशबाग रामलिला मैदानात होणारी ही परंपरा आता खंडित होईल. केवळ रावणाची प्रतिकृती जाळली जाणार असल्याचे या रामलिला कमिटीने ठरविले आहे.

यामागे जी कारणे आहेत त्याविषयी कमिटीने सांगितले की, रामायणात असा उल्लेख आहे की, कुंभकर्ण आणि मेघनाद यांनी रावणाला श्रीरामासोबत युद्ध करू नये असा सल्ला दिला होता. अर्थात, नंतर रावणासोबत ते युद्धात उतरले. पण त्यांचा सल्ला रावणाने नाकारला होता.

याआधीही म्हणजे पाच वर्षांपूर्वी या कमिटीचे अध्यक्ष हरिश्चंद्र अगरवाल आणि सचिव आदित्य द्विवेदी यांनी ही परंपरा बदलण्याचा सल्ला दिला होता पण त्यांना त्यावेळी इतर सदस्यांनी त्यांना नकार दिला होता. ३०० वर्षांची परंपरा असल्याचे कारण देण्यात आले होते.

हे ही वाचा:

देवीदेवतांची टिंगल उडवणारा मुनव्वर फारुकी गरब्यात मात्र नाचतो

दिल्लीत हिंदू तरुणाच्या हत्येने तणाव

महाराष्ट्राच्या ‘या’ शाळेला 5G चा पहिला मान

विमानतळावर ‘श्रीराम’ दिसले आणि…

 

रामचरितमानस आणि रामायणासंदर्भातील इतर पुस्तकांचे वाचन केल्यावर हे स्पष्ट झाले की, रावणाचा पुत्र मेघनाद याने म्हटले होते की, भगवान श्रीराम हे विष्णूचा अवतार आहेत आणि त्यांच्याविरोधात आपण युद्ध करता कामा नये. रावणाचा बंधू कुंभकर्ण याने म्हटले होते की, ज्या सीतेला तू पळवून आणले आहेस ती जगदंबा आहे. तिला तू सोडले नाहीस तर आपण सर्वस्व गमावून बसू, अगदी आपला जीवही जाईल. पण रावणाने हे सल्ले मानले नाहीत. त्यामुळेच आपण मेघनाद आणि कुंभकर्ण यांच्या प्रतिमा यापुढे जाळायच्या नाहीत असे ठरविल्याचे द्विवेदी यांनी म्हटले आहे.

यावेळी मात्र अगरवाल आणि द्विवेदी यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांचे मन वळविण्यात यश मिळविले. संतकवि गोस्वामी तुलसीदास यांच्या काळापासून ही परंपरा सुरू आहे, असे म्हटले जाते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,947चाहतेआवड दर्शवा
1,977अनुयायीअनुकरण करा
52,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा