29 C
Mumbai
Wednesday, August 4, 2021
घरधर्म संस्कृती‘श्री गुरु गोविंदसिंग जी रचित रामायण’ पुस्तकाने पंतप्रधान प्रभावित

‘श्री गुरु गोविंदसिंग जी रचित रामायण’ पुस्तकाने पंतप्रधान प्रभावित

Related

श्रीमती बलजित कौर तुळशी यांच्याद्वारे लिहिण्यात आलेल्या ‘श्री गुरु गोविंदसिंग जी रचित रामायण’ या पुस्तकाची पहिली प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली आहे. बलजित कौर तुळशी या प्रख्यात विधिज्ञ श्री के.टी.एस. तुळशी जी यांच्या मातोश्री आहेत. श्रीमती बलजित कौर तुळशी या सध्या हयात नाहीत, पण त्यांच्या कुटुंबियांच्या मार्फत या पुस्तकाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करण्यात आली. या पुस्तकाचे प्रकाशन आयजीएनसीएने यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून या विषयी माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये पंतप्रधानांनी या भेटीचे फोटोही शेअर केले आहेत. पंतप्रधान लिहितात, “प्रख्यात विधिज्ञ श्री. के.टी.एस. तुळशी यांच्या मातोश्री दिवंगत श्रीमती बलजित कौर तुळशीजी लिखित आणि ‘श्री गुरु गोविंदसिंग जी रचित रामायण’ या पुस्तकाची पहिली प्रत मिळाली. आयजीएनसीएने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.”

हे ही वाचा:

भावजयीवर ऍसिड हल्ला

तीन महिन्यांच्या मुलीला पुरणाऱ्या तृतीयपंथीयांना अटक

‘शरद पवार हाजीर हो’…कोरेगाव भीमा प्रकरणात लवकरच नोंदवणार साक्ष

अमितभाईंकडे काही गोष्टी गेल्या की, अनेकांना कापरे भरते

तर पुढे जाऊन पंतप्रधान लिहितात “आमच्या संवादा दरम्यान, विद्याविभूषित श्री के.टी.एस तुळशीजी हे शीख धर्माच्या उदात्त तत्त्वांबद्दल बोलले आणि त्यांनी गुरबानी शब्दांचे पठण केले. त्यांच्या या विचारांनी मी फारच प्रभावित झालो.

spot_img
पूर्वीचा लेखभावजयीवर ऍसिड हल्ला
आणि मागील लेखको”ऑपरेशन” ?

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,309अनुयायीअनुकरण करा
2,160सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा