27 C
Mumbai
Wednesday, September 28, 2022
घरधर्म संस्कृतीनितेश राणे यांनी धर्मांतराच्या रेटकार्डवरून साधला निशाणा

नितेश राणे यांनी धर्मांतराच्या रेटकार्डवरून साधला निशाणा

Related

अहमदनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून धर्मांतर करण्यास भाग पाडण्यात आल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी हिंदू मुलींचे धर्मांतर करण्यासाठी मुस्लिम तरुणांना आर्थिक मदत केल्याचा दावा केला आहे. त्यासाठी रेटकार्ड दिल्याचा आरोप त्यांनी विधानसभेत केला.

महाराष्ट्रासाठी हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये धर्मांतराच्या नावाखाली एका अल्पवयीन मुलीची फसवणूक करण्यात आली आहे. एका मुलीवर अन्याय आणि अत्याचार झाला. गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक करण्यात आली नाही. संबंधित पोलीस अधिकाऱ्याने आरोपीला स्थानिक कारागृहात ठेवले आहे.त्याला सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आले नाही असं नितेश राणे म्हणाले.

राणे पुढे म्हणाले, “सानप नावाच्या अधिकाऱ्याचे आरोपींसोबत आर्थिक व्यवहार असल्याची चर्चा आहे. आरोपींना घरचे जेवण दिले जात असून इतर मदतही केली जात आहे. महाराष्ट्रासाठी ही बाब गंभीर आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धर्मांतराच्या नावाखाली अल्पवयीन मुलींची फसवणूक केली जात असून असे करणाऱ्या तरुणांना पैशांसह सर्व प्रकारची मदत केली जात असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला.

ते पुढे म्हणाले, ‘हिंदू मुलींना धर्मांतरासाठी पैसे दिले जातात, बाइक दिल्या जातात. धर्मांतराला चालना देण्यासाठी आर्थिक मदत केली जात आहे. रेट कार्ड तयार झाले आहे. शीख मुलीला धर्मांतरासाठी ७ लाख, पंजाबी हिंदू मुलीसाठी ६ लाख, गुजराती ब्राह्मण मुलीसाठी ६ लाख, ब्राह्मण मुलीसाठी ५ लाख, क्षत्रिय मुलीसाठी ४ लाख. धर्मांतराच्या नावाखाली मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले जात आहे.

हे ही वाचा:

प्रज्ञानंद प्रार्थना करून बुद्धिबळ खेळयला करतो सुरुवात

नौशेरामधून लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक

दिल्ली, उत्तरप्रदेशात हल्ल्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्याच्या पुण्यातून आवळल्या मुसक्या

पाकिस्तानात ब्राह्मोस पडल्याप्रकरणी तीन अधिकारी बडतर्फ

धर्मांतरविरोधी कायदा लागू झाला पाहिजे

यावेळी नितेश राणे यांनी आरोपीचे ज्या अधिकाऱ्याशी संबंध आहेत, त्याला बडतर्फ करावे, अशी मागणी केली. महाराष्ट्रात अशा घटना वाढत आहेत. उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही धर्मांतरविरोधी कायदा लागू झाला पाहिजे, असे राणे म्हणाले

.
दोषी आढळल्यास कठोर कारवाई

आरोपींवर अनेक गुन्हे दाखल आहेत, त्याबाबत माहिती काढली जाईल आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रात पूर्वीपासूनच धर्मांतर कायदा आहे, कायद्यात कडक तरतुदी आहेत. आमिष दाखवून किंवा जबरदस्तीने कोणीही कोणाचे धर्मांतर करू शकत नाही. “कायद्यातील तरतुदींमध्ये त्रुटी असतील तर त्या अधिक कठोर करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरात सांगितले. नितेश राणेंनी उपस्थित केलेला मुद्दा अतिशय गंभीर आहे. अल्पवयीन असतानाही आरोपी इम्रान युसूफ कुरेशी याने पीडितेवर तीन वर्षे बलात्कार केला. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही पोलीस अधिकारी सानप यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्याला निलंबित करण्यात आले आहे. लगेच काढून टाकता येत नाही, त्यासाठी एक प्रक्रिया आहे. पण त्याला कठोर शिक्षा होईल.असही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,967चाहतेआवड दर्शवा
1,941अनुयायीअनुकरण करा
40,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा