34 C
Mumbai
Saturday, March 15, 2025
घरराजकारणकेजारीवालांच्या ‘शीशमहाला’चे दोन वर्षांचे वीज बिल ४१ लाखांहून अधिक

केजारीवालांच्या ‘शीशमहाला’चे दोन वर्षांचे वीज बिल ४१ लाखांहून अधिक

Google News Follow

Related

दिल्लीत सरकारमध्ये असताना झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणांमुळे अडचणीत आलेल्या अरविंद केजरीवालांचा पाय आता आणखी खोलात शिरला आहे. दिल्लीत सत्तेत असताना विजेच्या २०० युनिटच्या वापरावर लोकांना मोफत वीज देणारे अरविंद केजरीवाल स्वतःच्या मात्र वीज बिलामुळे अडचणीत आले आहेत. यामुळे आता भाजपाकडून त्यांच्यार टीका केली जात आहे. माहिती अधिकार (आरटीआय) अंतर्गत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरातून वीज बिलासंदार्भातील माहिती समोर आली आहे. यानुसार अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असताना ज्या बंगल्यामध्ये राहत होते त्याचे दोन वर्षांचे बिल ४१ लाख रुपयांपेक्षा जास्त होते.

आरटीआय कार्यकर्ते कन्हैया कुमार यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात, ऑक्टोबर २०२२ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान ६ फ्लॅग स्टाफ रोड येथील बंगल्यात ४१.५ लाख रुपयांची वीज वापरली गेली, असे सांगण्यात आले. याचं बंगल्याला ‘शीशमहाल’ असं भाजपाकडून म्हटलं जात असून बंगल्यातील सुखसुविधांवर कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे आरोप आहेत. याची चौकशीही सुरू आहे.

माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्यात दोन वर्षांत ५,६०,३३५ युनिट वीज वापरली गेली, ज्याचे बिल ४१,५१,३५० रुपये आहे. म्हणजेच सरासरी काढली तर, दररोज सुमारे ७६७ युनिट वीज वापरली जाते, ज्याची किंमत सुमारे ५७०० रुपये आहे. दिल्ली विधानसभा वेबसाईटनुसार, मुख्यमंत्र्यांना दरमहा ५००० युनिट वीज बिल परतफेड करण्याची तरतूद आहे, तर मंत्र्यांसाठी ही मर्यादा दरमहा ३००० युनिट आहे. म्हणजेच, अरविंद केजरीवाल यांना दरमहा ५००० युनिट मोफत वीज मिळत होती, तर त्यांचा सरासरी वीज वापर दरमहा २१००० युनिट होता.

हे ही वाचा..

तुझ्या मुलीचे लग्न माझ्याशी कर, मी तुझी ईएमआय भरतो

धक्कादायक! पुण्यात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार!

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची बांगलादेशला भेट

हिमाचल प्रदेश : महाशिवरात्री साजरी करण्यावरून मुस्लिमांनी हिंदूंवर गोळीबार केला

भाजपा प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी टीका करत म्हटले आहे की, “शीश महालावरील खर्चाची कहाणी सर्वांनी ऐकली आहे. केजरीवाल यांनी यावर जनतेचे ४५ कोटी रुपये कसे खर्च केले हे आपल्याला माहिती आहे. पण आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आरटीआयमध्ये असे दिसून आले आहे की मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचे वीज बिल २ वर्षात ४१.५ लाख रुपये होते. ५.६० लाख युनिट वीज वापरली गेली. कल्पना करू शकता की, किती एसी न थांबता चालू होते. हे तेच केजरीवाल आहेत ज्यांनी स्वतःच्या सुखसोयींवर कोट्यवधी रुपये खर्च केले. वॅगनआर कारमध्ये फिरणाऱ्या त्यांनी १.५ कोटी रुपयांची गाडी खरेदी केली, याची माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
235,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा