30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरदेश दुनियाकोविड लस हलाल की हराम? इंडोनेशियाच्या मौलवींना पेच!

कोविड लस हलाल की हराम? इंडोनेशियाच्या मौलवींना पेच!

Google News Follow

Related

कोविडची लस येणार म्हणून जगाने सुटकेचा निश्वास सोडला असताना इंडोनेशियातील मौलवी मात्र भलत्याच पेचाने हैराण आहेत. लवकरच हाती येणारी कोविडची लस हलाल की हराम यावर त्यांचा काथ्याकुट सुरू आहे.

ऑक्टोबर महिन्यात इंडोनेशियाच्या राजदूत आणि धर्मगुरू यांनी चीनचा दौरा केला. इंडोनेशियन राजदूत कोविड लसीसंदर्भात महत्वाच्या बैठकीत व्यस्त होते. पण मौलवींना मात्र वेगळीच चिंता सतावत होती. ‘कोविड लस शरिया कायद्याच्या चौकटीत बसणारी आहे का?’ या प्रश्नाने त्यांना भंडावून सोडले होते.

इस्लाम धर्मानुसार डुकराचे मांस निषिद्ध मानले जाते. पण हेच डुकराचे मांस औषधनिर्मिती प्रक्रियेतील एक महत्वाचा घटक आहे. ‘पोर्क’ हे औषधांमध्ये ‘स्टॅबिलायझर’ म्हणून वापरण्यात येते. पण अशी औषधे इस्लाममध्ये ‘हराम’ आहेत. इस्लामी देशांमध्ये त्यावर बंदी घातली जाते.

गेल्या काही वर्षात जगातील गैर इस्लामी देशात ‘हलाल’चा प्रभाव वाढलेला दिसतो. भारतासारखा हिंदू धर्मनिरपेक्ष देशही याला अपवाद नाही.

अर्थिक मजबूरीमुळे निर्यात होणाऱ्या अनेक उत्पादनांवर ‘हलाल सर्टिफाईड’ असे  छापण्यात येते. अशा पद्धतीचे हलाल प्रमाणपत्र देणाऱ्या काही संस्था जागतिक स्तरावर कार्यरत आहेत. एका समुदायामार्फत होणाऱ्या या दबावतंत्रा समोर आज जागतिक ‘ब्रॅण्ड्स’ पण झुकताना दिसतात. यापूर्वी स्विस कंपनी ‘नोव्हार्टीस’ ने मेनिन्जायटिस आजारावरची ‘हलाल’ लस निर्माण केली होती.

कोविडच्या महामारीने जग चिंताग्रस्त झाले असताना. कोविड लस हेच मोठे ‘वरदान’ मानले जात आहे. पण जीवन मरणाच्या पेचातही कट्टतावादी मौलवी ‘हलाल’ ‘हराम’ चा घोळ घालण्यात मश्गूल आहेत. फायझर, मॉडर्ना सारख्या लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी ‘पोर्क’ हा कोविड लसीचा भाग नसल्याचे आधीच स्पष्ट केले असताना ही चर्चा होतेय हे विशेष.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा