33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरराजकारणहेमंत सोरेन चौकशीला या! ईडीने पाठवले दुसरे समन्स

हेमंत सोरेन चौकशीला या! ईडीने पाठवले दुसरे समन्स

१७ नोव्हेंबरलाच चौकशीसाठी येण्यास ईडीने सांगितले

Google News Follow

Related

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने दुसरे समन्स बजावले आहे. मनी लॉड्रिंग आणि बेकायदेशीर खाणीप्रकरणी ईडीने हे समन्स सोरेन यांना बजावले आहे. समन्स मिळाल्यानंतर मुख्यमंत्री सोरेन यांनी ईडीला पत्र लिहिले. आपणाला चौकशीसाठी १६ नोव्हेंबर रोजी बोलणावण्याची त्यांनी ईडीला विनंती केली. परंतु त्यांची ही मागणी ईडीने फेटाळून लावली आहे. तुम्ही १७ नोव्हेंबरलाच चौकशीसाठी या, असे ईडीने त्यांना सुनावले आहे. नुकतेच ईडीने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना दुसरे समन्स बजावले आणि १७ नोव्हेंबरला रांची येथील कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. चौकशीला गैरहजर राहिल्यास तुमच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, अशा सजड दम त्यांना ईडीने दिला आहे.

ईडीने दिला १ नोव्हेंबर रोजी पहिला समन्स 

होताईडीने १ नोव्हेंबरच्या सायंकाळी सोरेन यांना पहिल्यांदा समन्स बजावले होते. त्यांना चौकशीसाठी ३ नोव्हेंबरला हजर राहण्यास सांगण्यात आले होते. परंतु सोरेन यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमाचे कारण देत चौकशीसाठी टाळाटाळ केली. त्यानंतर सोरेन यांनी ईडीला पत्र लिहून ३ आठवड्यांची मुदत मागितली. परंतु ईडीने नकार दिला. त्यानंतर ईडीने सोरेन यांना दुसरे समन्स बजावले. त्यांना १७ नोव्हेंबरला हजर राहावेच लागेल, अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सोरेन यांना सांगण्यात आले आहे.

हेही वाचा :

म्हणून अरुण गवळी येणार तुरुंगाबाहेर!

हत्येपूर्वी श्रद्धाने दिली होती मित्राला हत्येची माहिती

निवडणूक तिकिटासाठी आपच्या नेत्यांनी मागितले तीन कोटी

१७ नोव्हेंबर रोजी उपस्थित रहावे

झारखंडमध्ये सुरू असलेल्या मनी ल़ॉड्रिंग आणि बेकायदेशीर खाणीप्रकरणाच्या तपासासंदर्भात सोरेन यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. सोरेन यांचे आमदार पंकज मिश्रा यांच्या निवासस्थानी ८ जुलै रोजी ईडीने छापेमारी केली. या छापेमारीत ईडीला अनेक पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे हेमंत सोरेन यांना चौकशीसाठी बोलाण्यात आले आहे. यावरून झारखंडच्या राजकारणातही खळबळ उडाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा