28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरअर्थजगतमोदी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात ४ हजार रुपये पाठवणार

मोदी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात ४ हजार रुपये पाठवणार

Google News Follow

Related

केंद्र सरकार जून महिन्यात देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात ४००० रुपये पाठवण्याची शक्यता आहे. पंतप्रधान कृषी सन्मान योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवला होता. त्यावेळी शेतकऱ्यांना २००० रुपये देण्यात आले होते. आतापर्यंत ९ कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदवले आहे.

पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत नाव नोंदवण्यासाठी pmkisan.gov.in या संकेतस्थळावर एक अर्ज भरावा लागेल. नाव नोंदवल्यानंतर केंद्र सरकार थेट तुमच्या बँकेत पैसे ट्रान्सफर करेल.

गेल्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन न केल्यामुळे त्यांना २००० रुपयांचा हप्ता मिळाला नव्हता. त्यामुळे आत शेतकऱ्यांना पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत नाव नोंदवण्यासाठी ३० जूनपर्यंतची मुदत आहे. तुमचे नाव नोंदवले गेल्यानंतर एप्रिल-जूनचा हप्ता जुलै महिन्यात आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यात नवा हप्ता जमा केला जाईल. याचा अर्थ आता नाव नोंदवल्यास शेतकऱ्यांना प्रत्येकी २००० रुपयाचे दोन्ही हप्ते लागोपाठ मिळतील.

हे ही वाचा:

देशात २४ तासात ८७ लाखांपेक्षा जास्त लसीकरण

तीन महिन्यांनी कोरोना रुग्णसंख्या ४३ हजारांखाली

पत्र ‘प्रताप’ केवळ स्वार्थापोटी

अविनाश भोसलेंची ४० कोटींची संपत्ती सील

एखाद्या शेतकऱ्याने जून महिन्यात नोंदणी केली तर त्याला योजनेचा आठवा हप्ता जुलै महिन्यात मिळेल. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पुढचा हप्ता मिळेल. याचा अर्थ आता नाव नोंदवल्यास शेतकऱ्यांना प्रत्येकी २००० रुपयाचे दोन्ही हप्ते लागोपाठ मिळतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा