१० ते १२ डिसेंबर या कालावधीत संगमनेर, अहिल्यानगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय कबड्डी चाचणी स्पर्धेसाठी साक्षात कपिल साळुंखे या खेळाडूची निवड झाली आहे. मुंबई शहरातून निवड झालेला साक्षात हा एकमेव खेळाडू आहे.
साक्षात साळुंखे याला क्रीडापटूंचा मोठा वारसा लाभलेला आहे. साळुंखे कुटुंबात कुस्ती आणि कबड्डीची मोठी परंपरा आहे. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय,आशियाई सुवर्णपदक विजेते, शिवछत्रपती पुरस्कार विजेते असे नावलौकिक खेळाडू या घरात आहेत.
संपतराव साळुंखे -शिवछत्रपती पुरस्कार विजेते, स्नेहल साळुंखे- आशियाई सुवर्णपदक विजेती, सुजाता साळुंखे -राष्ट्रीय खेळाडू यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करीत असतो. डॉक्टर शिरोडकर स्पोर्ट क्लबचा हा खेळाडू मैदानामध्ये सराव करत असताना शाळेचे प्राचार्य पौर्णिमा तोरणे (माने)व क्रीडा शिक्षक सत्य विजय डामरे यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य असते.
हे ही वाचा:
ग्रिव्स–रोचने न्यूझीलंडची स्वप्ने मोडली!
नवी दिल्लीत भारत- अमेरिका व्यापार चर्चा करणार
भारत-अमेरिका व्यापार करार; गाजराची पुंगी वाजेल का?
या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडलेले खेळाडू असे-
जीत पाटील, विवेक वडाळी, यशराज घाटाळ, ध्रुव डोंगरे, अथर्व सुतार, यश धोडी, दिशांत शेलार, ओम घरत, कृशाल हाडळ, निखिल सावंत, भार्गव पाटील, क्रिशराज महतो, (सर्व विद्यार्थी विद्या विनोद अधिकारी विद्यालय, ज्युनियर कॉलेज, लालोंडे, पालघर) विवेक चोरघे (संदेश विद्यालय अँड ज्यु. कॉलेज, विक्रोळी, मुंबई उपनगर), विशाल तांडी (डॉ. पांडुरंग अमृते शिक्षण संस्थेची चं. चि. श्रॉफ इंग्लिश मीडियम हायस्कूल, सफाळे, जि. पालघर), सौरभ रहाटे (धाटाव औद्योगिक, रायगड), साक्षात साळुंखे (शिरोडकर हायस्कूल, परळ), यज्ञेश भोपी (कॅ. रवींद्र माधव ओक हायस्कूल, कल्याण डोंबिवली)
जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास होनमाने यांनी राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेसाठी निवड केलेला संघ.
