भारतीय क्रीडा प्राधिकरण (एसएआय), रीजनल सेंटर मुंबई यांच्यातर्फे आज (४ मार्च) ‘इंडिया मीडिया मीट २०२५’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारत सरकारच्या ‘फिट इंडिया’ आणि ‘खेलो इंडिया’ अशा उपक्रमाची माहिती मीडियाच्या मार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि फिटनेस-वेलनेस उपक्रमांच्या भविष्याबद्दल चर्चा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात क्रीडा पायाभूत सुविधा, खेळाडू विकास आणि फिटनेस आणि वेलनेसमध्ये सार्वजनिक सहभाग वाढवण्यासाठी एसएआयच्या (स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया) प्रयत्नांवर प्रकाश टाकण्यात आला. भारत सरकारच्या अशा उपक्रमांमुळे अनेक खेळाडूंना फायदा झाला असून भारतासाठी त्यांनी अनेक पदके मिळविले आहेत. या कार्यक्रमामध्ये विविध खेळांचे पदक विजेते खेळाडू उपस्थित होते. भारत सरकारच्या अशा उपक्रमांमुळे कशाप्रकारे फायदा झाला हे यावेळी खेळाडूंनी नमूद केले.
भारतामध्ये अनेक गुणवत्ता पूर्ण खेळाडू दडलेले आहेत. मात्र, आर्थिक परिस्थिती, संसाधनांची कमतरता आणि योग्य मार्गदर्शन अशा विविध समस्यांमुळे अनेक खेळाडू वर येत नाहीत. अशा गोष्टींच्या कमतरतेमुळे अनेकजण स्पर्धेत भागही घेत नाहीत. त्यामुळे इतर देशांच्या खेळाडूंच्या तुलनेने भारतीय खेळाडूंची ही संख्या कमीच असते. मात्र, भारत सरकार आता खेळाडूंची गुणवत्ता पाहून नवे नवे उपक्रम राबवत आहे, त्यांना वेगवगेळे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत. ‘खेलो इंडिया’ हा असाच भारत सरकारचा असाच एक उपक्रम आहे, ज्यामधून अनेक खेळाडू आपली कामगिरी दाखवत देशासाठी मेडल्स मिळवत आहेत. मात्र, भारत सरकारच्या अशा उपक्रमांची माहिती अद्याप देशाच्या, राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली नाहीये. या उपक्रमांची माहिती संपूर्ण लोकांना व्हावी आणि त्याचा फायदा घेत खेळाडूंनी पदके मिळवावी. याच पार्श्वभूमीवर आज फिट इंडिया मीडिया मीट २०२५’ कार्यक्रम पार पडला.
याबाबत माहिती देताना प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे (IRS) म्हणाले, भारत सरकार या अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून अंमलबजावणी करत आहे ते सर्व लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. भारत देश ‘स्पोर्टींग नेशन’ म्हणून ओळखला गेला पाहिजे. जगभरातील देशांच्या लोकसंख्येमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे, त्याच प्रमाणे खेळात देखील पहिला क्रमांकावर यायला हवा. ते पुढे म्हणाले, कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या खेळाडूंनी भारत सरकारच्या उपक्रमांमुळे कशाप्रकारे फायदा झाला हे सांगितले आणि हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचेल पाहिजे जेणेकरण सर्वाना त्याचा फायदा होईल. त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
भारत सरकारचे हे उपक्रम राज्याच्या तळागाळापर्यंत पोहोचावे यासाठी पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे. आज जिल्हा पातळीवर ‘खेलो इंडिया सेंटर’ आहे. खेळाडू आपली गुणवत्ता दाखवून त्याठिकाणी सिलेक्ट होतील. ‘खेलो इंडिया’ला सेंट्रल गव्हर्नमेंट फंडिंग करत आणि राज्य सरकारसुद्धा मॉनिटर करते. त्यामुळे असे उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचल्यानंतर तळागाळातील टॅलेंट टॅप करता येईल आणि त्यांना वर उचलता येईल, असे अधिकारी पांडुरंग चाटे म्हणाले.
यावेळी कांदिवलीमध्ये बांधण्यात आलेल्या ‘नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स, मुंबई मल्टीपर्पज हॉल’बाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली. खेळाडूंनासाठी सर्व सुविधापूर्वक असे हे सेंटर आहे. याठिकाणी खेळाडूला प्रॅक्टिस, जिम, मसाज, एखाद्याला खेळाडूला इंज्युरी असले तर त्याच्यावर योग्य उपचार करून त्याला पुन्हा तयार केले जाते. शारीरिकसह मानसिक संतुलन व्यवस्थित ठेवण्यासाठीही मार्गदर्शन दिले जाते. तसेच खेळाडूंच्या संपूर्ण डायटवर लक्ष्य ठेवले जाते.
महाराष्ट्रात असे सेंटर उभे करून सर्व खेळाडूंना याचा फायदा झाला पाहिजे, असे अधिकारी पांडुरंग चाटे यांनी सांगितले.
हे ही वाचा :
उत्तर प्रदेशमध्ये ८ वर्षांत एकही नवा कर लावला नाही
युक्रेनची लष्करी मदत थांबवणे म्हणजे पुतीन यांची मदत करणे
हाकलेपर्यंत मुंडे यांनी वाट पाहिली…
कुस्तीगीर सागर धनखड हत्या प्रकरणात आरोपी सुशील कुमारला जामीन
यावेळी कुस्तीपटू समर्थ म्हाळवे, महिला कुस्तीपटू प्रगती गायकवाड, जलतरणपटू ऋषभ अनुपम दास आणि जिम्नॅस्टिक्स निशांत निनाद करंदीकर हे खेळाडू कार्यक्रमाला उपस्थित होते. या सर्व खेळाडूंनी ‘खेलो इंडिया सारख्या उपक्रमांचा फायदा घेत आपली गुणवत्ता दाखवत आंतरराष्ट्रीय पदके मिळविले आहेत.
यावेळी बोलताना १७ वर्षीय कुस्तीपटू समर्थ म्हाळवे म्हणाला, ८-१० वर्ष झाली मी सर्व करतो. २०२२ मध्ये मला ‘साई’मध्ये (स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया) येण्याची संधी मिळाली. याठिकाणी भरती झाल्यानंतर चांगले प्रॅक्टिस उत्तमरित्या होत आहे, चांगले मागर्दर्शन मिळते. त्यानंतर ८-९ नॅशनल पदके जिंकली. २०२४ मध्ये आशियाई कुस्ती स्पर्धेत, रौप्यपदक मिळाले. आता २०२८ च्या ऑलम्पिकमध्ये मेडल मिळविणे हे माझे लक्ष्य आहे, असे कुस्तीपटू समर्थ म्हाळवे याने सांगितले.