शिर्डीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिर्डी संस्थांनच्या तीन कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला झाला आहे. सोमवारी (३ फेब्रुवारी) पहाटे कामावर येत असताना वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर हल्ला करण्यात आला. या चाकू हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे शिर्डीत एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेत सुभाष साहेबराव घोडे, नितीन कृष्णा शेजुळ या दोन साईसंस्थान कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर कृष्णा देहरकर असे गंभीर झालेल्या युवकाचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अज्ञातांकडून हा हल्ला करण्यात आला. हल्ल्याचे अद्याप कारण समोर आलेले नाही. पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
हे ही वाचा :
इंग्लंडच्या प्रिन्स एडवर्ड यांची राज्यपालांशी भेट
‘त्रिवेणी’ अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळवणाऱ्या भारतीय वंशाच्या चंद्रिका टंडन आहेत कोण?
उद्योगपती धनंजय दातार म्हणतात, विकासाभिमुख अर्थसंकल्प
वांद्रे टर्मिनसमधील रिकाम्या ट्रेनच्या डब्यात महिलेवर अत्याचार; हमाल आरोपीला अटक
हल्ल्याचे सीसीटिव्ही फुटेज समोर आले आहेत. यामध्ये हल्लेखोर चाकूने हल्ला चढवताना दिसत आहे. पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे. भाजपाचे नेते सुजय विखे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली. व्हाईटनर नशेमध्ये धूत असणाऱ्यांकडून हा हल्ला करण्यात आल्याचे दिसून येते. हल्लेखोर हल्ला चढवत त्यांच्या खिश्यातून पैसे काढण्याचे कृत्य झाले आहे. हल्ल्यातील आरोपी लवकरच अटक होतील, असे सुजय विखे पाटील यांनी म्हटले.