मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मागील महिन्यात दावोस दौरा पार पडला. डेटा सेंटर्स, ऑटोमोबाईल्स, सेमिकंडक्टर, ईव्ही, इलेक्ट्रॉनिक्स, स्टील, अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योग, औषधी आणि पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात मोठ्या संख्येने सामंजस्य करार या दौर्यात झाले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरून उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. दावोस दौऱ्याऐवजी महाराष्ट्रात कार्यक्रम घेतला असता तर २० ते २५ कोटींचा खर्च वाचला असता, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते. आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उत्तर देत पोलखोल केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गझलकार सुरेश भट म्हणतात, साऱ्याच शंकांची अशी मागू नको तू उत्तरे, असतात शंकेखोर जे त्यांचे कधी झाले बरे. ते पुढे म्हणाले, दावोस दौऱ्यादरम्यान १५ लाख ७० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे ५४ सामंजस्य करार केले. यातल्या ४५ करारांमध्ये आताच सिरीयस प्रोग्रेस आताच झालेला आहे.
देशामध्ये झालेल्या कराराचे गुंतवणुकीत रुपांतर होणे याचा दर ३५ ते ४५ टक्के इतका आहे. १० वर्षामागील महाराष्ट्राचा दर बघितल तर ८० टक्के पासून ९१ टक्के पर्यंत आहे. दावोसच्या दौऱ्यावरून विरोधकांनी अनेक वक्तव्य टीका केली गेली. टीका करणाऱ्यांनी सांगावे २०२२ ला दावोसला कोण गेले होते?, असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, जानेवारी २०२२ मध्ये आदित्य ठाकरे दावोसला गेले होते. त्याठिकाणी ८० हजार कोटींचे करार केले गेले. मात्र, करार करणाऱ्या सर्व कंपन्या भारतीयच असल्याचे सांगत त्यांनी आदित्य ठाकरेंची पोलखोल केली.
हे ही वाचा :
न्यूझीलंड अंतिम फेरीत भारताचा विजयीरथ रोखणार?
काशी, अयोध्येनंतर आता मथुरेच्या विकासाची वेळ आली आहे!
जागतिक महिला दिन : नौदलाच्या महिला लेबेनॉनमध्ये आयोजित करणार योगसत्र
पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची हॉटेल सहाराच्या खोलीत घेतला गळफास
ते पुढे म्हणाले, दुर्दैवाने या कंपन्यांनी माघार घेतली, चीनमुळे तयार झालेल्या प्रॉब्लेममुळे यांनी माघार घेतली. पण त्यांना पुन्हा आणण्याचा आपण प्रयत्न करू. दावोसमध्ये एखादे राज्य १६ लाख रुपयांची गुंतवणूक आणते तेव्हा त्याचा जगात डंका वाजतो. यावेळी सहा राज्य दावोसमध्ये होते. बाकीच्या राज्यांनी प्रयत्न केला. मात्र, आपले राज्य यामध्ये अव्वल राहिले. दावोसमध्ये फक्त महाराष्ट्राची चर्चा होती. त्यामुळे याकडे संकोचित बुद्धीने न पाहता एक व्यापक बुद्धीने पाहिले पाहिजे.
गुजरातपेक्षा तिप्पट गुंतवणूक महाराष्ट्राने मिळविली आहे. गुजरात, कर्नाटक आणि दिल्ली अशा राज्यांची गुंतवणूक एकत्रित केली तरीही महाराष्ट्राची गुंतवणूक जास्त आहे. त्यामुळे रोज उठून गुजरातची तारीफ करायची बंद करा, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.