त्रीभाषा संदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयाचा ठाकरे बंधूना विशेष आनंद झालेला दिसतोय, त्यांनी जरूर विजयी मेळावा घ्यावा. पण याच्या पाठीमागची भूमिका देखील त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. समिती तयार करणारे तेच, त्यात आपल्याच उपनेत्याला टाकणारे तेच, समितीची शिफारस कि पहिली पासून बारावी पर्यंत हिंदी सक्तीची करा कॅबिनेटमध्ये घेणारे तेच, कॅबिनेटचा निर्णय करणारे आणि निर्णयावर सही करणारे तेच. आता विजयी मेळावा घेणारे तेच. कोण दुटप्पी आहे? हे मराठी माणसाला लक्षात आले आहे. आमचा विषय पक्का आहे, मराठी मुलांच्या हितासाठी जो समिती निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. विधानभवन परिसरात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अनेक विषयांवर ते बोलत होते.
महाराष्ट्रात मराठीच पण मारहाण चुकीची
आम्हाला मराठीचा अभिमान आहे, पण भाषेवरून मारहाण करणे चुकीचे. महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही, पण मराठी येत नाही म्हणून एखाद्याला मारहाण करणे चुकीचे. असंख्य मराठी व्यायसायिक इतर राज्यात व्यवसाय करतात, त्यातील काहींना तेथील भाषा येत नाही म्हणून त्यांच्याशी अशीच वागणूक होईल का?. अशी गुंड शाही योग्य नाही, नाहीतर कारवाई केली जाईल. खरा अभिमान असेल तर मराठीची सेवा करा, शिकवा, क्लासेस चालू करा, लोकांना बोलण्यासाठी प्रवृत्त करा आणि मराठीचा खरा अभिमान असेल तर आपल्या मुलांना मराठी शिकवा-मराठी शाळेत टाका. अशा शाळेत का टाकता जिथे मराठी तिसरी भाषा आहे. मनपाच्या अशा शाळा का सुरु करता, ज्यात स्पष्टपणे लिहिले आहे कि मराठी भाषा तिसरी भाषा असेल. हे चालते आणि तिकडे व्यापाऱ्यांना मारताय हे योग्य नाही.
हे ही वाचा :
प्रसिद्ध समालोचक रवी शास्त्री यांच्या मातोश्रींनी बॉम्बे जिमखान्यात लगावला ‘हास्यषटकार’
राज्यात अमली पदार्थांविरोधात आक्रमक लढा!
भारताचे ऑपरेशन ‘सिंधू’, पाकिस्तानच्या घशाला कोरड!
दिल्ली सरकारचा जुन्या गाड्यांवर बंदी घालण्याचा निर्णय अखेर मागे!
जय गुजरात म्हणणे चुकीचे कसे?
यापूर्वी एकदा चिक्कोडीत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन करताना शरद पवार ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘जय कर्नाटक’ म्हणाले होते. याचा अर्थ त्यांचे महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकावर जास्त प्रेम आहे असे ठरवायचे का?. आपण ज्यांच्या कार्यक्रमात जातो त्यावेळी त्या संदर्भात बोलत असतो. गुजराती कार्याक्रमामध्ये जय गुजरात म्हटले म्हणजे एकनाथ शिंदे यांचे गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठी-महाराष्ट्रावरचे प्रेम कमी झाले इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही. मराठी माणूस वैश्विक आहे, मराठी माणसानेच अटकेपार झेंडा नेला, संपूर्ण भारताला स्वतंत्र केले, संपूर्ण भारतातील मुघली सत्ता घालवण्याचे आणि दिल्लीवर भगवा झेंडा लावण्याचे काम मराठी माणसाने केले. त्यामुळे असा संकुचित विचार करणे चुकीचे आहे.
मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो पण दुराग्रह नाही
महाराष्ट्रात राहून मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो पण दुराग्रह करू शकत नाही. तामिळनाडू मध्ये गेल्यांनंतर मला कोणीही दुराग्रह करू शकत नाही कि मी तमिळ शिकली पाहिजे. भारतात राहणारे आपण बाजूची राज्ये काही पाकिस्तानी नाहीयेत. एवढी संकुचित वृत्ती मराठी माणूस करू शकत नाही.
🕟 4.27pm | 4-7-2025📍Vidhan Bhavan, Mumbai.
LIVE | Media Interaction#MonsoonSession2025 #Mumbai #Maharashtra https://t.co/6TnxEvB47X
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 4, 2025
