भारतीय जनता पक्षाचे खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी सोमवारी (२० ऑक्टोबर) सांगितले की, या दिवाळीच्या हंगामात पाच लाख कोटी रुपयांचा व्यापार अपेक्षित आहे. त्यांनी भारतात बनवलेल्या उत्पादनांची मागणी आणि वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) व्यवस्थेत अलीकडेच करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण सवलतींकडे लक्ष वेधले.
“दिवाळी हा केवळ दिल्लीसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी एक मोठा सण आहे. पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत झालेली वाढ, स्वदेशीची मागणी आणि जीएसटीमध्ये लक्षणीय सवलती पाहता, या दिवाळीत ५ लाख कोटी रुपयांचा व्यापार होण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान मोदींनी कल्पना केलेल्या आत्मनिर्भर भारताची ही सुरुवात आहे,” असे प्रवीण खंडेलवाल यांनी एएनआयला सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतरांनीही देशाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. धनत्रयोदशीनिमित्त दिल्ली सरकारने शनिवारी कर्तव्य पथावर सर्वसामान्यांसाठी “दीपोत्सव” कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात १.५१ लाख दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती, त्यासोबत रामकथा, ड्रोन शो आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. याप्रसंगी कार्तव्य पथ दिव्यांनी आणि ड्रोन शोने प्रकाशित करण्यात आला.
हे ही वाचा :
टॅरिफ वॉरचा अमेरिकेला दणका; चीनने सोयाबीनची आयात थांबवली
स्टारलिंकने १० हजार उपग्रह केले प्रक्षेपित
“राहुलजी, लवकर लग्न करा, लग्नाची ऑर्डर हवी आहे”
म्यानमारमधून तस्करी केलेली बियाणे, सुपारीची १ कोटींची खेप जप्त
दिवाळी हा पाच दिवसांचा सण आहे जो धनत्रयोदशीपासून सुरू होतो. धनत्रयोदशीला लोक दागिने किंवा भांडी खरेदी करतात आणि देवांची पूजा करतात. दुसऱ्या दिवसाला नरक चतुर्दशी म्हणतात. याला छोटी दिवाळी असेही म्हणतात .
दिवाळीचा तिसरा दिवस हा उत्सवाचा मुख्य दिवस आहे. लोक या दिवशी भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात आणि त्यांना संपत्ती आणि समृद्धी मिळावी म्हणून प्रार्थना करतात. दिवाळीचा चौथा दिवस गोवर्धन पूजेला समर्पित असतो. पाचव्या दिवसाला भाऊबीज म्हणतात.







