त्रिपुरामध्ये बीएसएफने मोठी कारवाई करत पाच दिवसांत १४ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ड्रग्जसह १.७५ कोटी रुपयांचा माल जप्त केला आहे. सुरक्षा दलाने घुसखोरांसह तस्करांनाही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सुरक्षा दलाकडून पुढील कारवाई सुरु आहे.
बांगलादेशी-रोहिंगे यांच्या घुसखोरीचे प्रमाण वाढत असल्याचे समोर येत आहेत. देशभरातून दररोज अशा घुसखोरीच्या बातम्या समोर येत आहेत. तसेच बेकायदेशीररित्या भारतात शिरकाव केलेल्या घुसखोरांवर कारवाई सुरुच आहे. राज्यातील पोलीस पथके शोध मोहीम राबवत अशा घुसखोरांना शोधून काढत आहेत, त्यांच्यावर कारवाई करत, त्यांना त्यांच्या देशात रवानगी करण्याचे काम सुरु आहे. भारताच्या सीमेवरून घुसखोरी होवू नये यासाठी बीएसएफचे जवान लक्ष ठेवून आहेत. याच दरम्यान, त्रिपुरामध्ये अशीच घुसखोरी बीएसएफने हाणून पाडली आहे.
हे ही वाचा :
झाशीहून प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनवर दगडफेक; तोडफोडीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
तामिळनाडूमध्ये इसिस मॉड्यूल प्रकरणी १६ ठिकाणी एनआयएकडून छापेमारी
२६/११ चा दहशतवादी राणाला भारतात आणण्यासाठी एनआयएचे पथक लवकरच जाणार अमेरिकेला
बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, २० जानेवारी ते २५ जानेवारी २०२५ या कालावधीत विशेष रणनीती अवलंबून बीएसएफने घुसखोरी आणि सीमापार तस्करीचे अनेक प्रयत्न हाणून पाडले आहेत. या कारवाईत १४ बांगलादेशी आणि ५ भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली. या कालावधीत सुमारे १.७५ कोटी रुपयांची औषधे, साखर, प्राणी आणि इतर बंदी घातलेल्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.
बीएसएफने बीजीबी (बॉर्डर गार्ड बांगलादेश) सोबत समन्वित गस्त देखील घातली आहे आणि लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी सीमावर्ती गावांमध्ये ५० हून अधिक बैठका घेतल्या आहेत. कोणत्याही प्रकारची घुसखोरी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी सीमेवर उच्च पातळीची दक्षता ठेवण्यात येत असल्याचे बीएसएफने म्हटले आहे.