29 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेषहिंदूंच्या पलायनामुळे धुमसती मालवणी!

हिंदूंच्या पलायनामुळे धुमसती मालवणी!

काश्मीर खोऱ्यातला हिंदू समाज देशोधडीला लागून आता चार दशकांहून अधिक काळ लोटला. परंतु स्वत:च्या देशात पलायन करण्याचा हा सिलसिला अद्यापि थांबलेला नाही. देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहरही याला अपवाद नाही. होय, हे मुंबईत घडते आहे. ऐकून धक्का बसेल, पण गेल्या दहा वर्षात मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या उपद्रवामुळे मालवणीतून शेकडो हिंदूनी घर सोडून पलायन केले आहे. अजूनही लोक पळ काढतायत. वाचा हा सविस्तर रिपोर्ट.

Google News Follow

Related

मुंबईच्या मालाड उपनगरातील ‘मालवणी’ हा एकेकाळचा हिंदू बहुल भाग. मासेमारी करून उदरनिर्वाह करणारा कोळी समाज इथला भूमिपुत्र. पण इथे आज लोकसंख्येचे गणित १८० अंशात बदलले आहे. मालवणीमध्ये हिंदू अल्पसंख्यांक झाले असून मुस्लीमांचा टक्का लक्षणीय वाढला आहे. मुस्लीम गुंडाच्या टगेगिरीला कंटाळून गेल्या काही वर्षात इथल्या शेकडो परिवारांनी पलायन केले आहे. उरल्या-सुरल्या हिंदू, बौद्ध, जैन आणि इतर समाजावर इथून काढता पाय घेण्यासाठी हरप्रकारे दबाव आणला जात आहे. हिंदू तरुणांना मारहाण, जातीवाचक शिवीगाळ, महिलांची छेडछाड असे संतापजनक प्रकार दिवसाढवळ्या घडत आहेत.

भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मालवणी भागाला भेट देऊन या विषयाला वाचा फोडली.

छेडा कॉम्प्लेक्सची कथा….
मालवणी ब्लॉक नंबर पाच मधील ‘छेडा कॉम्प्लेक्स’ ही अशीच एके काळची बहुतांश हिंदू वस्ती असणारी इमारत. १९९२ मध्ये ही कॉम्प्लेक्स बांधली गेली तेव्हा या इमारतीत १४५ घरांपैकी फक्त ८ कुटुंब मुस्लिम तर बाकी सगळे हिंदू होते. पण आता याच इमारतीत हाताच्या बोटावर मोजण्याइतकी हिंदू कुटुंब शिल्लक राहीली आहेत. छेडा कॉम्प्लेक्सच्या दारात २०१८ साली उभी राहिलेली बेकायदेशीर मशीद याचे प्रमुख कारण! २०१८ साली रमजानच्या तोंडावर ‘मस्जिद हजरत अली’ उभी केली गेली. ही जागा तिथल्याच ‘सवेरा’ नावाच्या सोसायटीच्या मालकीची आहे. पण एकदा का लोकसंख्येचा टक्का वाढला की महापालिकेला विचारतो कोण? २०१८ सालीच या मशिदीवर कारवाई करण्यासाठी बीएमसीचा बुलडोझर आला होता, पण काही ‘अदृश्य हातांनी’ त्याला ब्रेक लावला.
.

‘हिंदू चले जाओ…’
या मशिदीचा विस्तार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. छेडा कॉम्प्लेक्सच्या हद्दीतील भिंत तोडून, वहिवाटीच्या रस्त्यावर मशिदीतून जिना टाकण्यात आला आहे.

छेडाच्या आवारातील अनधिकृत जिना

या मशिदीचा त्रास स्थानिक नागरिकांना होतोच, पण सोबतच २५ पेक्षा अधिक वर्ष ‘शेजारी’ म्हणून राहणाऱ्यांच्या दबावाखाली जगावे लागते आहे. इतके वर्ष ज्यांच्या भावना जपण्यासाठी ‘छेडा’ मधील हिंदू बांधवांनी ‘सेक्युलॅरिझम’ चा आदर्श घालत गणपती बसवला नाही. त्यांच्यावरच आता ‘४० लाख मे घर बेचके चले जाओ’ असा दबाव येतोय. या दबावाला आजवर अनेक बळी पडले. अनेक जण त्या मार्गावर आहेत.

मालवणी ब्लॉक नंबर ७ मध्ये भाजी बाजार आहे. सुरवातीला इथले सर्व भाजी विक्रेते हिंदू होते, पण आता त्यांची जागा टोपी, दाढीवाल्यांनी घेतली आहे. ४ वर्षांपूर्वी मदरश्याच्या नावावर आणखी एक डेरा टाकला गेला आणि पुढे वर्षभरात तिथे मशीद उभी राहिली. याच परिसरात ३ वर्षांपूर्वी म्हाडाच्या जागेवर एक बेकायदेशीर मशीद उभी राहिली. मशीद उभी राहिल्या नंतर आजूबाजूंच्या हिंदू कुटुंबाना मनस्ताप देण्याचे निरनिराळे प्रकार सुरु झाले. हिंदूंच्या घरांत पाणी फेकणे, लोखंडी सळी फेकणे, हिंदू तरुणांवर जमावाने हल्ले करणे, महिलांची छेड काढणे असे प्रकार मालवणीत नित्याचे झाले आहेत. अशाच एका ताज्या प्रकरणात सय्यद हाशम उर्फ ख्वाजा या स्थानिक गुंडाने हिंदू दलित कुटुंबांना जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात हा प्रकार घडला. या गुंडाच्या मेहरबानीनेच मालवणी गेट नंबर ७ च्या परिसरात पालिकेच्या जागेत अंमली पदार्थांची विक्री, वेश्याव्यवसाय असे अनधिकृत धंदे चालतात. स्थानिक रहिवाशांनी या विरोधात सातत्याने तक्रारी केल्यामुळे महापालिकेला कारवाई करणे भाग पाडले. पण ख्वाजाने या धंद्यांचे ‘पुनर्वसन’ केले आणि आवाज उठवणाऱ्या दलित हिंदूंना धमकावून ‘शांत’ केले. स्थानिक रहीवाशी जेव्हा जेव्हा तक्रार करायला जातात तेव्हा पोलिसांनी साधी अदखलपात्र तक्रारही नोंदवली नाही. स्थानिक रहीवासी प्रशांत सुतार यांनी पोलीस उपायुक्तांना लिखित तक्रार केली आहे.

महापालिकेच्या बंद शाळा बनल्या चरस-गांज्याचे अड्डे
गेल्या काही वर्षांत मालवणी परिसरातील महापालिकेच्या अनेक शाळा बंद पडल्या आहेत. बंद पडलेल्या शाळांमध्ये मराठी, हिंदी, गुजराती आणि तामिळ माध्यमाच्या शाळा आहेत. या उलट अनेक उर्दू माध्यमाच्या शाळा मालवणीमध्ये वाढल्या आहेत. हिंदू समाजाचे होणारे पलायन आणि मुसलमानांचा वाढता टक्का हे याचे मुख्य कारण. महापालिकेच्या बंद पडलेल्या शाळा अनेक गैर कारभाराचे अड्डे बनले आहेत. इथे चरस- गांजाच्या व्यवसायापासून- देहविक्रीपर्यंत सर्व गोष्टी खुल्लेआम चालत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. सुतार यांनी पोलिसांना पाठवलेल्या पत्रातही याचा उल्लेख केला आहे. शाळेच्या जागेवर फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. पण महापालिकेच्या अजब दाव्यानुसार या शाळेत आजही हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात.

ढोल बंद, भोंगे सुरु
मशिदींवरचे अनधिकृत भोंगे हा सदा सर्वकाळ इस्लामेतर लोकांसाठी त्रासाचा विषय आहे. मालवणी परिसरही त्याला अपवाद नाही. या भोंग्यांच्या आवाजाचा कर्णकर्कश्य मारा सर्वधर्मियांना ‘कान दाबून’ सहन करावा लागतो. पण हिंदू धर्मियांच्या उत्सवांत मात्र तत्परतेने निर्बंध लादले जातात. मालवणी परिसरातील गणेशोत्सव आणि नवरात्री मंडळांना मात्र ‘कडक नियम’ लावले जातात. आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत मशीद आली कि ‘ढोल-ताशे बंद’ चा फतवा थेट पोलिसांकडूनच काढला जातो. देशातला ‘सर्वधर्मसमभाव’ जपायची जबाबदारी ‘फक्त हिंदूंची’ आहे आणि ती त्यांनी तत्परतेने पार पाडावी याची खबरदारी स्थानिक पोलीस घेत असतात.

इव्ह टीजिंगची दहशत
मालवणीत राहणाऱ्या हिंदू महिला दहशतीच्या सावटात वावरत आहेत. छेडछाडीचे हे प्रकार अश्लील कॉमेंट करणे किंवा शिट्ट्या मारणे इथपर्यंतच मर्यादित नसून महिलांना धक्काबुक्की करणे, स्पर्श करण्यापर्यंत इथल्या टग्यांची मजल गेली आहे. हिंदू तरुणींवर नजर ठेवून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी रस्त्यावरचे अनेक ‘मज्नू’ घात लावून बसलेले असतात. या भाबड्या तरुणींना जाळ्यात ओढणे हा एकच उद्देश यामागे असतो. घरातली महीला किंवा तरूणी बाहेर गेली की ती घरात परतेपर्यंत घरच्यांचे काळीज धडधडत असते. छेडछाडीच्या तक्रारी पोलिस ठाण्यात नेण्याचा काहीच उपयोग होत नाही असा अनुभव असल्यामुळे सहन करणे एवढाच एक मार्ग उरतो. जेव्हा सहन शक्ती संपते तेव्हा गाशा गुंडाळून पळ काढणे एवढाच एक मार्ग उरतो. मालवणीतले अनेक परिवार गेल्या काही वर्षात इथून पळाले त्याचे महत्वाचे कारण इव्ह टीजिंग हेच आहे. मालवणीतल्या कट्टरवाद्यांना याची पूर्ण कल्पना असल्यामुळे या शस्त्राचा व्यवस्थित वापर त्यांच्याकडून सुरू आहे.

‘बंगाली मुस्लिम फेडरेशन’ मधले बंगाली की बांग्लादेशी?
गेल्या काही वर्षांत मालवणी मध्ये बंगाली मुस्लिमांची संख्या अचानकपणे वाढते आहे. ‘बंगाली मुस्लिम फेडरेशन’ नावाची एक संस्था इथे स्थापन करण्यात आली असून संस्थेचे बॅनरही इथे लागत असतात. ही संस्था नेमके काय करते हे स्थानिकांना माहीत नाही. हे बंगाली मुस्लिम नेमके कोण आहेत? नक्की बंगाली आहेत की बांग्लादेशी? यात कोणी रोहिंग्या तर नाहीत ना? असे अनेक प्रश्न मालवणातील स्थानिकांना पडले आहेत. या लोकांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. गेल्या काही वर्षात स्थानिक हिंदू फेरीवाल्यांना हुसकावून यांनी त्यांची जागा बळकावली आहे.

‘सवेरा’वासियांच्या जीवनात अंधार!
छेडा कॉम्प्लेक्सच्या शेजारी असणारी सवेरा सोसायटी ही नुकतीच खाली करण्यात आली. सवेरामध्ये लोक पागडी पद्धतिने रहात होते. जमील मर्चंट या गुंडाने ही इमारत खाली करवून घेतली असा आरोप सवेरातील रहिवाशांनी केला आहे.

लॉकडाऊनच्या काळात जेव्हा सगळं प्रशासन ठप्प होतं तेव्हा इथे मात्र प्रशासनाला हाताशी धरून ही इमारत खाली करण्यात आली.पद्धतशीरपणे इमारतीचे पाणी आणि वीज तोडून रहीवाशांना बाहेर काढण्यात आले. लॉकडाऊन मध्ये कोणालाही बेघर करू नका हा न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवत हे करण्यात आले. सवेरातील नागरिकांनी जमील विरोधात तक्रार आणि निदर्शनेही केली पण त्याचा उपयोग झाला नाहीये. सवेरामध्ये काही मवाळ मुस्लीमांची काही घरे होती हे विषेश परंतु कट्टरवादी गुंडासमोर त्यांनीही नांगी टाकली.

‘सवेरा’ वासीयांचे आंदोलन

अंबोजवाडी मध्ये सरकारी जागेवर झोपडपट्ट्या??
मालवणीत नजीकच्याच अंबोजवाडी भागात सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून झोपडपट्टी वसवली जात असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळते. या अनधिकृत झोपड्या दोन-तीन लाखांना विकल्या जातात आणि त्या विशिष्ट समाजालाच देऊन त्यावर कब्जा केला जातो. हे सर्वप्रकार जमिलच्या आशीर्वादाने त्याचे बगलबच्चे करत असल्याचे म्हणणे आहे. मार्वे रस्ता, धारीवली या सारख्या भागांमध्येही अशाच प्रकारचे अतिक्रमण होत असल्याचा आरोप आहे.

गावगुंडांचे खरे ‘मसीहा’ कोण ?
मालवाणीतल्या गैर कारभारातले प्रमुख मोहरे हे तिथले स्थानिक गुंड आहेत. गुंडगिरीच्या एका ताज्या घटनेत एमएचबी कॉलनी मध्ये नाश्त्याचा स्टॉल चालवणाऱ्या एका हिंदू महिलेला ‘तुम कल यहा कैसे स्टॉल लगाती हो मै देखता हू’ असे म्हणत धमकावण्यात आल्याचा प्रथम माहिती अहवाल मालवणी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. स्थानिक गरीब हिंदूंना धमकावणारे हे लोक नक्की कोण आहेत? यांचा मसीहा नक्की कोण आहे? पोलीस यांच्या विरोधात कारवाई का करत नाहीत?

मालवाणीतले स्थानिक हिंदू आज दहशतीच्या छायेत जगात आहेत. जगण्याच्या मूलभूत हक्कासाठी रोज नवा संघर्ष करत आहेत. “मलावणीमध्ये आम्ही अल्पसंख्यांक झाले आहोत… आम्हाला न्याय कोण मिळवून देणार?” असा सवाल स्थानिक हिंदूंकडून उठवला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

6 कमेंट

  1. अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे हा. मालवणी हे प्रातिनिधिक आहे, मुळात pan Islam संकल्पना अजुन जनसामान्यापर्यंत पोहिंचली नाही. एरवीही काही उपयोग नसणार आहे ती माहीत होऊन. सर्वधर्मसमभाव नावाखाली खरेतर भीतीने हिंदू शांत राहतील . आणि राजकीय पक्षांच्या भूमिकेवर तर बोलणेच नको. त्यांची सत्तेची भूक देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या आणि नंतर फळणीत बळी गेलेल्या लाखो कुटुंबाचे हौतात्म्य वाया घालणार हे नक्की.

  2. इसके सगळे घडे पर्यंत गुप्त वार्ता कडून सरकार ला ही सर्व माहिती पोहचवली जात नाही का? आणि जय ही माहिती मिळून सरकार कडून काहीच कारवाई कशी होत नाही , का मुद्दामुन तिकडे मतबॅंके मुळे डोळेझाक केली जाते ?
    ही तर सुरुवात आहे , हिंदू समाजाने सर्व शक्तीनिशी जातीभेद गाडून ह्याचा मुकाबला केला पाहिजे . हिंदुत्व वादी संघटना मग त्या शिवसेना व संघवाले कसे काय गप्प बसतात .

  3. धन्यवाद आपने पहली बार ऐसी घटनाओं पर ध्यान दिया है और जाहिर किया है लेकिन यह सोची समझी योजनाओं के तहत मालवणी नहीं पूरे भारत में हो रहा है और मुंबई की बात करें तो मुंबई में हर जगह मुस्लिमों की संख्या बढ़ती जा रहे हैं मालवणी हो गया बांद्रा हो गया जोगेश्वरी हो गया मीरा रोड हो गया मुंब्रा हो गया कुर्ला हो गया ऐसे बहुत सी जगह है जहां पर यह प्रॉपर्टी खरीद रहे हैं मस्जिद मदरसे बनाकर वहां करें हिंदुओं को लाइन होने को मजबूर कर रहे हैं ऐसी ही स्थिति कोलाबा झोपड़पट्टी ओ में भी है और आपको एक नया विषय में बताता हूं मुंब्रा में बांग्लादेशी मुसलमान बड़ी संख्या में रहते हैं और उनकी पहचान करना बहुत ही मुश्किल होता है और उन्होंने हिंदुस्तान में अपने जो भी आवश्यक कागजात होते हैं वह बनवा कर ले लिए हैं और वह कई मूल मुस्लिम जो हिंदुस्तान के हैं उन्हें पहले शादी करते हैं फिर झगड़ा करते हैं फिर उनको मालूम चलता है यह बांग्लादेशी है तो तलाक के नाम पर पैसा वसूली का काम जोरों से चल रहा है आप इस विषय पर ध्यान दीजिए कि मुंब्रा में मुसलमान भी बहुत तकलीफ में है और आपने न्यूटन का जो चैनल चालू किया है आप इसी तरह ही निडर होकर इसको चलाते रहे आप जिन से सहयोग मिले उनसे सहयोग लीजिए ना मिले उनको भी बोलिए समझाइए धन्यवाद जय हिंद जय भारत

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा