34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरविशेषधार्मिक कट्टरतावादावर फ्रान्सचा पलटवार

धार्मिक कट्टरतावादावर फ्रान्सचा पलटवार

जगाला इस्लामी कट्टरतावादाने घेरलेलं असताना, नवीन  कायदा लागू करून फ्रान्सने आपण त्यांना शरण जाणार नसल्याचा संदेश दिला आहे. एरवी शांतताप्रिय, कलासक्त अशा फ्रेंच मनोवृत्तीने इतके कठोर पाऊल उचलावे, हे जगासाठी सूचक आहे.

Google News Follow

Related

फ्रान्समध्ये लवकरच येऊ घातलेल्या नव्या कायद्याने इस्लामी कट्टरतावादावर चाप बसेल. यात कुठेही इस्लामचे नाव घेण्यात आले नसले तरी या कायद्याने इस्लामच्या कट्टरतेवर लगाम कसला जाईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. अद्यापि या कायद्याला मंजूरी मिळालेली नसली तरी लवकरच हा कायदा प्रत्यक्षात येणार आहे. फ्रान्समधील शाळांमध्ये होणारे पाश्चिमात्य संस्कार टाळण्यासाठी मुलांना घरातच इस्लामचे शिक्षण देण्याचा प्रकार गेल्या काही वर्षात सुरू आहे. नव्या कायद्यामुळे घरगुती शिक्षण, मशिदींचे आर्थिक व्यवहार आणि धार्मिक तेढ पसरवणारी वक्तव्ये यावर अंकुश निर्माण होईल.

The Economistच्या ९ डिसेंबर २०२०च्या अंकात प्रकाशित झालेल्या अहवालात याबाबत सविस्तर माहीती देण्यात आली आहे. इकॉनॉमिस्टच्या वृत्तानुसार नव्या कायद्यांतील तरतुदींमुळे मशिदींतील आर्थिक व्यवहारांवर सरकारची नजर राहिल. त्याचबरोबर सरकारला सर्व इमामांच्या प्रशिक्षणाची निगराणी करण्याचा अधिकार प्राप्त होईल. समानतेच्या मूल्यांना धाब्यावर बसवणारी प्रार्थनास्थळे बंद करण्याचा अधिकार, या कायद्याने सरकारला प्राप्त होईल. फ्रान्सने धर्मनिरपेक्षतेची चौकट स्वीकारून ११५ वर्षांपूर्वी अमलात आणलेल्या कायद्यानुसार, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारचे धार्मिक ओळख दाखवणारे चिन्ह अथवा कपडे वापरणे प्रतिबंधीत आहे. क्रुस किंवा हिजाबवर सार्वजनिक ठिकाणी बंदी आहे. नव्या कायद्याने हे नियम सरकारसोबत करारबद्ध झालेल्या खाजगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील लागू होतील.

घरगुती शिक्षण देण्यासाठी पालकांना अर्ज करून, त्याचे सबळ कारण द्यावे लागेल. या कायद्याला मंजूरी मिळाल्यानंतर ३ वर्षांवरील मुलामुलींना शाळेत दाखल करणारे पालकांना भाग पडेल. याच कायद्याने धार्मिक तेढ पसरवणारी भाषणे केल्याबद्दल कठोर शिक्षेस सामोरे जावे लागेल. नव्या कायद्याने, मुलींच्या कौमार्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांना देखील कठोर कारवाईस तोंड द्यावे लागेल.

या सर्व तरतुदी मागील काही वर्षांत फ्रान्समध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यांच्या विरोधातील कठोर प्रतिक्रिया आहेत. The Economist मधील वृत्तानुसारच, या कायद्यासंदर्भात बोलताना फ्रान्सचे पंतप्रधान जीन कास्टेक्स यांनी स्पष्ट केले, की हा कायदा कोणत्याही धर्माच्या विरोधात नाहीत, ते इस्लामच्याही विरोधातही नाहीत. फ्रेंच लोकांत फूट पाडू इच्छीणाऱ्या  कट्टरतावादाच्या विरोधात आहेत हा कायदा आहे.

फ्रान्स २०१२ पासूनच इस्लामी कट्टरतावादाने प्रेरित भ्याड हल्ल्यांना सामोरा जात आहे. कधी अंधाधुंद गोळीबार तर कधी सुसाट वाहनाने लोकांना चिरडणे अशा घटनांमुळे फ्रान्स दहशतीच्या सावटाखाली राहात होता. २०१५ मध्ये या हल्ल्यांनी अमानवतेचा कळस गाठला. बीबीसीच्या २६ जुलै २०१६च्या वृत्तानुसार २०१५ मध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या सहा घटना घडल्या पॅरिसमधील बाताक्लान नाट्यगृहावर २०१५ मध्येच दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केलेला. त्यानंतर अशा भीषण हल्ल्यांची मालिकाच सुरू झाली. चार्ली हेब्दो या नियतकालिकावर झालेल्या हल्ल्यामुळे तर अवघे जग हादरले होते. नीसमध्ये गर्दीत ट्रक घालून ८४ लोकांना चिरडून ठार मारल्याची क्रुर घटना २०१६ मध्ये घडली. त्यानंतर नीसमध्येच एका चर्चमध्ये चाकू घेऊन केलेल्या भ्याड हल्ल्यात तीन नागरीकांनी आपले प्राण गमावले. २०१५ नंतर पुन्हा एकदा चार्ली हेब्दो या मासिकावर २०२० मध्ये हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. आधीच्या हल्ल्यामुळे चार्ली हेब्दो मासिकाचे कार्यालय नव्या गुप्त स्थळी नेण्यात आले होते. त्यामुळे हल्लेखोराचा प्रयत्न फसला असला तरीही, या हल्ल्यात दोन नागरिक गंभीर रित्या जखमी झाले. पॅरिसमधील शाळेवरील हल्ल्यात सॅम्युएल पॅटी नावाच्या शिक्षकाचा शिरच्छेद करू निर्घृण हत्या करण्यात आली हा अगदी अलिकडचा अघोरी प्रकार. यापैकी बहुतेक हल्ल्यांमध्ये जगाच्या विविध भागातून आलेल्या निर्वासितांचा हात होता. 

‘द गार्डियन’ वृत्तसंस्थेच्या सप्टेंबर २०१५ च्या वृत्तानुसार तत्कालिन राष्ट्राध्यक्ष फ्रान्सिस्वा ओलांद यांनी युरोपात आफ्रिका आणि मध्यपूर्वेतून येणाऱ्या निर्वासितांना सामावून घेण्यासाठी प्रत्येक देशाने निश्चित आणि स्वतंत्र अशी यंत्रणा उभी करावी असे सुचवून या मुद्यावर जर्मनीला पाठिंबा दिला होता.

फुकाचे औदार्य दाखवून वैयक्तिक प्रतिमा चमकवण्याच्या नादात नेत्यांनी अवघ्या देशाला संकटात लोटल्याची भावना त्या त्या देशात आहे.

Pew Templetion Global Religious Futures या संकेतस्थळावरुन प्राप्त झालेल्या लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार २०१० मध्ये फ्रान्समध्ये एकूण लोकसंख्येत ७.५% इतकी मुस्लिम लोकसंख्या होती. ती वाढून आता २०२० मध्ये ८.१% झालेली आहे. 

फ्रान्समध्ये  हल्ले करणा-यांचे मनसूबे उघड आहेत. चार्ली हेब्दोत प्रकाशित झालेल्या प्रेषितावरील व्यंगचित्रामुळे अवघा फ्रान्स तीन वेळा हादरला. परंतु या धक्क्यातून सावरलेला फ्रान्स आता प्रतिहल्ल्याच्या मानसिकतेत आहे. अलिकडेत सर्व सरकारी इमारतींवर चार्ली हेद्बोत प्रसिद्ध झालेले तेच व्यंगचित्र लेझर प्रतिमांच्या माध्यमातून फ्रान्स सरकारने झळकवले. आम्ही कट्टरतावादासमोर झुकणार नाही असा स्पष्ट संदेश जगाला दिला. आता नव्याने होऊ घातलेला हा कायदा याच धोरणाचे दुसरे दमदार पाऊल. स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा उद्घोष करत फ्रान्स जगाला लोकशाहीचे आधुनिक प्रारुप दिले. आता तोच फ्रान्स कट्टरतावादाला गाडण्याचा नवा मंत्र देतोय.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा