घरबिजनेस‘अतिरिक्त उत्पादन क्षमता’चा अमेरिकेचा दावा भारताने फेटाळला

‘अतिरिक्त उत्पादन क्षमता’चा अमेरिकेचा दावा भारताने फेटाळला

‘आत्मनिर्भर भारत’वरच्या आक्षेपांना प्रत्युत्तर

अमेरिकेकडून भारताच्या औद्योगिक धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना केंद्र सरकारने अमेरिकेचे आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहेत. भारतात अतिरिक्त उत्पादन क्षमता असल्याचा अमेरिकेचा दावा चुकीचा असल्याचे सांगत देशातील कोणत्याही औद्योगिक क्षेत्रात संरचनात्मक अतिरिक्त उत्पादन क्षमता नसल्याचे वाणिज्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने (USTR) भारतासह अनेक देशांच्या उत्पादन धोरणांची चौकशी सुरू केली आहे. मात्र, भारताने आपल्या औद्योगिक विकासाचे समर्थन करत देशातील उत्पादन क्षमता बाजारपेठेतील मागणी आणि आर्थिक गरजांनुसार विकसित होत असल्याचे ठणकावून सांगितले आहे.

भारताच्या उत्पादनवाढीला अतिरिक्त क्षमता म्हणून संबोधणे योग्य नसल्याची भूमिका सरकारने मांडली आहे. ‘मेक इन इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’ आणि उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन योजना (PLI) यांच्या माध्यमातून भारत देशांतर्गत उद्योगांना बळ देत आहे. आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, रोजगारनिर्मिती करणे आणि जागतिक उत्पादन क्षेत्रात भारताचा वाटा वाढवणे हा या धोरणांचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे देशाच्या औद्योगिक विकासाला व्यापारातील असमतोलाचे कारण ठरवण्याच्या अमेरिकेच्या भूमिकेला भारताने आक्षेप घेतला आहे.
हे ही वाचा:
पासपोर्टमधील त्रुटींप्रकरणी सौरव दास विरोधात लूकआऊट सर्क्युलर

गुजरातमध्ये महामार्गावर उतरली लष्कराची विमाने

पाकिस्तानचे हित जपणारा पक्ष म्हणजे काँग्रेस!

संविधान कमकुवत करणाऱ्यांच्याच हाती पाच दशके सत्ता

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून भारतासह विविध देशांवर आयात शुल्क वाढवण्याच्या प्रस्तावांवर विचार सुरू आहे. या संभाव्य शुल्कवाढीमुळे भारतीय निर्यातदारांसमोर आव्हाने निर्माण होऊ शकतात. विशेषतः औषधनिर्मिती, पोलाद, सौर ऊर्जा आणि उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंधांमधील तणावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मात्र, अमेरिकेच्या दबावामुळे आपल्या औद्योगिक धोरणांमध्ये तडजोड करण्याऐवजी भारताने चर्चेचा मार्ग स्वीकारण्यावर भर दिला आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार कराराच्या चर्चेतून व्यापारविषयक मतभेद सोडवता येऊ शकतात, अशी भारताची भूमिका आहे. अमेरिकेच्या आरोपांना उत्तर देताना भारताने आपल्या उत्पादन धोरणांचे समर्थन केले असून, देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक हितसंबंधांना प्राधान्य देण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version