घरविशेषगुजरातमध्ये महामार्गावर उतरली लष्कराची विमाने

गुजरातमध्ये महामार्गावर उतरली लष्कराची विमाने

अमृतसर-जामनगर इकॉनॉमिक कॉरिडॉरवर यशस्वी लँडिंग-टेकऑफ

देशातील महामार्ग आता केवळ प्रवास आणि वाहतुकीपुरते मर्यादित राहणार नाहीत, तर देशाच्या संरक्षणासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीतही महत्त्वाची भूमिका बजावू शकतील. गुजरातमध्ये अमृतसर-जामनगर इकॉनॉमिक कॉरिडॉरवरील महामार्गावर भारतीय लष्कराच्या चार विमानांनी यशस्वी लँडिंग आणि टेकऑफ केले. या ऐतिहासिक कामगिरीची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. आधुनिक महामार्ग हे देशाच्या सामरिक गरजा आणि लष्कराच्या कार्यात्मक आवश्यकताही पूर्ण करू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.

भारतीय लष्कराच्या ‘टीम माउंटन ईगल्स’ या पथकाने ‘विंग्स ऑफ व्हॅलर अँड युनिटी एक्स्पेडिशन’ अंतर्गत ही मोहीम राबवली. गुजरातमधील अमृतसर-जामनगर इकॉनॉमिक कॉरिडॉरवरील NH-754A च्या ९४६ ते ९४९ किलोमीटरदरम्यानच्या पट्ट्यावर ही चाचणी घेण्यात आली. या चार विमानांमध्ये दोन फिक्स्ड विंग मायक्रोलाइट विमाने आणि दोन पॉवर्ड हँग ग्लायडर्सचा समावेश होता. या विमानांनी महामार्गावर अचूक लँडिंग केले आणि त्यानंतर पुन्हा यशस्वी उड्डाणही केले.

या मोहिमेसाठी भारतीय लष्कर आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) एकत्रितपणे तयारी केली होती. विमानांच्या सुरक्षित लँडिंगसाठी महामार्गाचा पृष्ठभाग, रुंदी, रचना आणि सुरक्षिततेच्या निकषांची तपासणी करण्यात आली. स्थानिक प्रशासन, पोलीस आणि एनएचएआयच्या पथकांनी महामार्गावरील वाहतूक तात्पुरती वळवली. विमानांच्या लँडिंगनंतर इंधन भरण्याची प्रक्रियाही राबवण्यात आली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली.

हे ही वाचा:

पाकिस्तानचे हित जपणारा पक्ष म्हणजे काँग्रेस!

संविधान कमकुवत करणाऱ्यांच्याच हाती पाच दशके सत्ता

काश्मीरमधून गायब झालेले ३० जण पाकिस्तानात सक्रिय

अनंत अंबानींसोबतच्या व्हायरल व्हिडीओवरून शाहरुखची कायदेशीर नोटीस

युद्धकाळात महामार्ग ठरणार पर्यायी धावपट्टी

या प्रयोगामुळे भविष्यात युद्धजन्य परिस्थितीत किंवा आपत्कालीन प्रसंगी महामार्गांचा पर्यायी धावपट्टी म्हणून वापर करण्याची क्षमता अधोरेखित झाली आहे. विमानतळ उपलब्ध नसल्यास किंवा त्यांचा वापर शक्य नसल्यास अशा महामार्गांचा उपयोग लष्करी आणि आपत्कालीन कामांसाठी होऊ शकतो. याशिवाय योग्य सुरक्षा व्यवस्था आणि आवश्यक परवानग्यांसह महामार्गांवरून पर्यटन, एअरो-अ‍ॅडव्हेंचर आणि इतर उपक्रम राबवण्याचीही शक्यता गडकरी यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version