भिवंडी शहरात शोरमा खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. वंजारपट्टी नाका परिसरातील एका शोरमा स्टॉलवरून शोरमा खाल्लेल्या नागरिकांना उलट्या, जुलाब, मळमळ आणि तापाचा त्रास सुरू झाला. या घटनेत बाधितांची संख्या वाढत असून, अनेकांना उपचारासाठी भिवंडीतील इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाधितांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
माहितीनुसार, सोमवारी रात्री नागरिकांनी वंजारपट्टी नाका परिसरातील ए. के. शोरमा या स्टॉलवरून शोरमा खाल्ला होता. त्यानंतर काही तासांतच अनेकांना पोटदुखी, उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला काही मोजक्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर रुग्णांची संख्या सातत्याने वाढली. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दोन लहान मुले आणि दोन महिलांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर नऊ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून, सध्या १०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बाधितांमध्ये ५६ पुरुष, ३५ महिला आणि २५ लहान मुलांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
काश्मीरमधून गायब झालेले ३० जण पाकिस्तानात सक्रिय
अनंत अंबानींसोबतच्या व्हायरल व्हिडीओवरून शाहरुखची कायदेशीर नोटीस
हिंदूंना न्याय दिलात तर खबरदार…
उमर खालिद, शर्जिल इमामला जामीन नाही!
महापालिकेचा शहरभर बुलडोझर
या घटनेनंतर भिवंडी महापालिकेने अनधिकृत खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या स्टॉल्स आणि हातगाड्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. दिवसभरापासून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या मोहिमेत अनेक अनधिकृत स्टॉल्स आणि अतिक्रमणे हटवण्यात आली. कारवाईदरम्यान काही ठिकाणी नागरिक आणि महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये वादही झाले.
