घरविशेषकाश्मीरमधून गायब झालेले ३० जण पाकिस्तानात सक्रिय

काश्मीरमधून गायब झालेले ३० जण पाकिस्तानात सक्रिय

हिजबुल मुजाहिदीनसाठी काम करत असल्याचा पोलिसांचा दावा

जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातून १९९१ ते २००३ या काळात बेपत्ता झालेले ३० जण पाकिस्तानात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्वांनी पाकिस्तानात जाऊन शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेतल्याचा आणि सध्या तिथूनच भारतविरोधी दहशतवादी कारवाया चालवत असल्याचा दावा जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक नलिन प्रभात यांनी केला आहे. हे सर्वजण हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

महोर आणि चसाना परिसरातील हे ३० जण अनेक वर्षांपूर्वी बेपत्ता झाले होते. मात्र, ते पाकिस्तानात गेल्याचे आणि तिथे शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेतल्याचे तपासातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. पाकिस्तानातून हे दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये शस्त्रे, दारूगोळा आणि आर्थिक मदत पुरवत आहेत. तसेच स्थानिक तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी प्रवृत्त करणे आणि त्यांचे कट्टरपंथीकरण करण्याचे कामही करत असल्याचा आरोप आहे.

नलिन प्रभात यांच्या माहितीनुसार, २९ नोव्हेंबर २०२४ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे महोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता. या तपासादरम्यान साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. त्यातून पाकिस्तानात असलेल्या काही दहशतवाद्यांनी रियासी जिल्ह्यातील आपल्या वडिलोपार्जित जमिनी विकून त्यातून मिळणारा पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले.

पाच दहशतवाद्यांची मालमत्ता जप्त

या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांची ओळख पटवली आहे. त्यात मोहम्मद कय्यूम ऊर्फ अब्दुल कय्यूम (महोर), बशीर अहमद ऊर्फ मासूम (बिद्दर), शौकत अली (हुंदर), मंजूर अहमद ऊर्फ मंजूर हुसेन (थुरू) आणि इम्तियाज अहमद (थुरू) यांचा समावेश आहे. या पाच जणांच्या २७ कनालपेक्षा अधिक जमिनीवर पोलिसांनी जप्तीची कारवाई केली आहे. पोलिसांच्या मते, या जमिनी विकून मिळणारा पैसा शस्त्रास्त्रे खरेदी करणे, तरुणांची भरती करणे आणि दहशतवादी हल्ल्यांसाठी वापरण्याची योजना होती. बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यांतर्गत (UAPA) ही कारवाई करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

अनंत अंबानींसोबतच्या व्हायरल व्हिडीओवरून शाहरुखची कायदेशीर नोटीस

हिंदूंना न्याय दिलात तर खबरदार…

उमर खालिद, शर्जिल इमामला जामीन नाही!

युवीचा गुरुमंत्र, वैभवचा षटकारतंत्र!

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील स्थानिक दहशतवादी नेटवर्क संपवण्याच्या प्रयत्नांदरम्यान आता पाकिस्तानात बसून कारवाया करणाऱ्या जुन्या दहशतवादी नेटवर्कवरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. केवळ शस्त्रांच्या माध्यमातूनच नव्हे, तर आर्थिक व्यवहार आणि मालमत्तांच्या माध्यमातून दहशतवादाला मिळणारा निधी रोखण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version