घरविशेषराज्यातील ३३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तीन महिने मोफत धान्य

राज्यातील ३३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तीन महिने मोफत धान्य

४२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दिलासा

राज्यात दुष्काळाचे सावट गडद होत असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ३३ जिल्ह्यांमधील सुमारे ४२ लाख ३० हजार ७८३ शेतकरी कुटुंबांना पुढील तीन महिने मोफत अन्नधान्याचे वाटप केले जाणार आहे. या निर्णयानुसार प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा पाच किलो धान्य दिले जाणार असून त्यामध्ये तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गव्हाचा समावेश असेल.

राज्यातील अनेक भागांत पुरेसा पाऊस न झाल्याने खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे. त्यातच रब्बी हंगामही संकटात सापडल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पिकांचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अशा दुहेरी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील तसेच थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजनेत समाविष्ट नसलेल्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पुढील तीन महिने नियमितपणे धान्यवाटप केल्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना अन्नधान्याच्या खर्चातून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version