घरक्राईमनामापाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशमधून शस्त्र तस्करी करणारे १० तस्कर अटकेत

पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशमधून शस्त्र तस्करी करणारे १० तस्कर अटकेत

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचने मोठी कारवाई करत वॉल्टेड सिटी परिसरातून आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या मोठ्या शस्त्र तस्करीच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश येथून शस्त्रे तस्करी करून दिल्ली तसेच इतर राज्यांतील गुन्हेगारी टोळ्यांना पुरवठा करत होती. या प्रकरणात १० तस्करांना अटक करण्यात आली असून २१ उच्च दर्जाची परदेशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय सुमारे २०० जिवंत काडतुसेही पोलिसांनी हस्तगत केली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये अत्याधुनिक सब-मशीन गन आणि सेमी-ऑटोमॅटिक पिस्तुले आहेत. यामध्ये PX-5.7 आणि PX-3 सारखी शस्त्रे असून ती अनुक्रमे विशेष दलांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरली जातात. तसेच स्टॉएगर (तुर्की), शॅडो CZ (चेक प्रजासत्ताक), बेरेटा (इटली), टॉरस (ब्राझील) आणि वॉल्टर (जर्मनी) या नामांकित कंपन्यांची शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.

दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा तस्करीचा कारभार संघटित आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत होता. ही शस्त्रे पाकिस्तानहून भारत- नेपाळ सीमेमार्गे भारतात आणली जात होती आणि त्यानंतर स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांपर्यंत पोहोचवली जात होती. या शस्त्रांचा वापर दिल्लीमध्ये गुन्हे करण्यासाठी केला जात होता.

हे ही वाचा:

दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला राज्यसभेवर पाठवा!

दिल्लीतील अकबर रोड, रायसीना रोड येथील कार्यालये रिकामी करण्यासाठी काँग्रेसला नोटीस

तिरंगाधारी सहा एलपीजी टँकर येतायत भारतात

“अमेरिका स्वतःशीच वाटाघाटी करतेय”

अटक करण्यात आलेल्या तस्करांनी चौकशीत कबूल केले की ते या नेटवर्कमध्ये दीर्घकाळापासून कार्यरत होते आणि शस्त्रांची खरेदी- विक्री करण्यासाठी त्यांच्याकडे पूर्ण लॉजिस्टिक योजना होती. पोलिसांचे म्हणणे आहे की, या कारवाईमुळे दिल्ली आणि आसपासच्या भागातील शस्त्र तस्करीला मोठा धक्का बसला आहे. दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचने ही कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी ऑपरेशन असल्याचे सांगितले असून अशा टोळ्यांवर पुढेही कठोर कारवाई सुरू ठेवली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version