घरक्राईमनामातव्यावर बसून आशीर्वाद देणाऱ्या गुरुदास बाबावर बलात्काराचा गुन्हा दाखल!

तव्यावर बसून आशीर्वाद देणाऱ्या गुरुदास बाबावर बलात्काराचा गुन्हा दाखल!

गुन्हा दाखल झाल्यानंतर भोंदू बाबा फरार, पोलिसांकडून शोध सुरु

अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील मार्डीच्या आश्रमातील गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकरवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भाविक महिलेचा अश्लील व्हिडीओ तयार करून लैंगिक शोषण करणाऱ्या गुरदास बाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर भोंदू बाबा फरार झाला आहे.

गरम तव्यावर बसून भक्तांना आशिर्वाद देणारा बाबा म्हणून गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकरवर प्रसिद्धीस आला होता.परंतु याच बाबावर आता बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.एका महिलेचा गैरफायदा घेऊन तिचे शोषण केल्याचे समोर आले आहे.अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात असलेल्या मार्डी येथे बाबाचे आश्रम आहे.गुरुदासबाबा म्हणून ओळख असलेल्या बाबाचे नाव सुनील कावलकरवर असे आहे.

हे ही वाचा:

नितीश कुमार बिहारचे नवव्यांदा मुख्यमंत्री

विंडीजच्या जोसेफने घेतले ७ बळी, गॅबावर ऑस्ट्रेलियाला केले पराभूत

चांदीच्या झाडूने केली जाणार प्रभू राम मंदिराच्या गर्भगृहाची स्वच्छता!

बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदी सम्राट चौधरी, विजय सिन्हा यांची वर्णी

आपल्या समस्येचे निराकरण व्हावे यासाठी लोक या बाबाच्या आश्रमात येत असतात.दरम्यान, अशीच एक समस्या घेऊन मध्यप्रदेशातील जबलपूर येथे राहणारी महिला बाबाच्या आश्रमात आली.परंतु गुरुदास बाबाने महिलेला आश्रमात बोलावून तिच्यावर अत्याचार केला आणि अश्लील व्हिडीओ देखील काढला, असा आरोप या पीडित महिलेने केला आहे.

या प्रकरणी अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार गुरुदास बाबाला शोधण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.दरम्यान, गुरुदास बाबा हा अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मार्डी गावाचा रहिवासी आहे.या गावात बाबाचे आश्रम असून याठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून दरबार भरतो.बाबाच्या दर्शनासाठी हजारो भाविक दरबारात येत असतात.गुरुवार, शनिवार आणि अमावस्या, पौर्णिमेला मोठ्या प्रमाणावर बाबाचा दरबार भरतो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version