घरक्राईमनामाबॉलिवूड अभिनेता दलीप ताहिलला दोन महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा!

बॉलिवूड अभिनेता दलीप ताहिलला दोन महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा!

ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणी शिक्षा

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता दलीप ताहिल याला ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणी दोन महिन्याची तुरुंवासाची शिक्षा न्यायालयाकडून ठोठावण्यात आली आहे.ही संपूर्ण घटना २०१८ साली घडली होती, याचा आज निकाल लागला आणि अभिनेत्याला दोन महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.दलिप ताहिल यांनी दारूच्या नशेत असताना एका रिक्षाला धडक मारली होती.या घटनेत एक महिलाही जखमी झाली होती.

दलीप ताहिल हे एक बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत.दलीप ताहिल यांनी बाजीगर , राजा, फिर भी दिल है हिंदुस्तानी , भाग मिल्खा भाग, रा.वन, इश्क , रा.वन , कहो ना प्यार है आणि सोल्जर यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.मात्र, ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणी अभिनेत्याला दोन महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.हे प्रकरण जुने आहे म्हणजे २०१८ मधील आहे.घडले असे की, याचिकाकर्ती जेनिता गांधी ही महिला आपल्या मित्रासोबत रिक्षाने जात होत्या.त्यावेळी दलीप ताहिल यांच्या गाडीने त्यांना धडक दिली. अपघातानंतर दलिप ताहिल यांनी घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत अडकल्यामुळे ते पकडले गेले.’धडक दिल्यावर आम्ही रिक्षातून उतरलो, तेव्हा कार दलीप ताहिल चालवत असल्याचं आमच्या लक्षात आलं. आम्ही गाडीचा नंबर लिहून घेतला.

हे ही वाचा.. 

कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांची हुर्यो!

आईमुळे बलात्कारी पुत्राला २० वर्षे सक्तमजुरी!

मसूद अझहरचा निकटवर्तीय दहशतवादी दाऊद मलिकला ठोकले!

मसूद अझहरचा निकटवर्तीय दहशतवादी दाऊद मलिकला ठोकले!

ताहिल यांनी गाडीबाहेर येऊन वाद घालायला सुरुवात केली आणि माझ्या मित्राला धक्काबुक्की केली.’ असं जेनिता गांधींनी जबानीत लिहिलं. या प्रकरणी दलिप ताहिल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी अभिनेता दलीप ताहिल यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली असली तरी हा खटला सुरूच होता. अशा परिस्थितीत आता या खटल्याचा निकाल आला आहे. एका रिपोर्टनुसार, त्यावेळी मुंबईतील खार पोलीस स्टेशनच्या एका इन्स्पेक्टरने सांगितले होते की, दलीप ताहिल यांनी रक्त तपासणीसाठी नमुने देण्यास नकार दिला होता. या घटनेत जखमी झालेल्या तिघांवर पोलिसांनी वैद्यकीय उपचार केले. त्यानंतर दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी दलीपला अटक करण्यात आली आणि नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती.आज या प्रकरणाचा निकाल लागला आहे आणि अभिनेता दलीप ताहिल याला शिक्षा होत दोन महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version