घरक्राईमनामाआर्यन खान प्रकरणातला पंच प्रभाकर साईल मृत्युमुखी

आर्यन खान प्रकरणातला पंच प्रभाकर साईल मृत्युमुखी

मुंबई कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा पुत्र आर्यन खानला अटक केल्यानंतर या प्रकरणाला अनेक वेगवेगळी वळणं मिळाली होती. या प्रकरणात एनसीबीचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल हे चांगलेच चर्चेत आले होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान त्यांनी काही गौप्यस्फोट केले होते. मात्र, प्रभाकर साईल यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रभाकर यांचे शुक्रवार, १ एप्रिल रोजी राहत्या घरी निधन झाले.

प्रभाकर साईल यांचे शुक्रवारी त्यांच्या चेंबूर येथील माहुल भागातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, अशी माहिती प्रभाकर यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिली. आज सकाळी ११ वाजता प्रभाकर साईलचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरी येथील त्यांच्या घरी आणले जाणार आहे आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर ज्या क्रूझवरून त्याला अटक करण्यात आली होती, त्या क्रूझबाहेर आपण हजर होतो, असा दावा प्रभाकर साईल यांनी केला होता. किरण गोसावीचा सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या प्रभाकर साईल यांनी माध्यमांसमोर येत ड्रग्ज प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे केले होते.

हे ही वाचा:

तुझे तेज अंगी शतांशी जरीही

गुढीपाडव्याला काय असतात विधी?

‘ऑनलाईन ज्ञान घेऊन ते जीवनात वापरायला हवं’  

सतीश उके यांना ६ एप्रिल पर्यंत ईडी कोठडी

प्रभाकर साईल यांनी मुंबई एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. आर्यन खानला सोडण्यासाठी मध्यस्थातर्फे २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे करण्यात आली होती, असा दावाही साईलने केला होता. तसेच समीर वानखेडे यांच्या सांगण्यावरून आपण पंच म्हणून कोऱ्या कागदावर सही केल्याचेही साईल यांनी म्हटले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version