घरक्राईमनामाप. बंगालमध्ये एनआयएच्या पथकावर हल्ला

प. बंगालमध्ये एनआयएच्या पथकावर हल्ला

बॉम्बस्फोट प्रकरणी अटक करण्यासाठी एनआयएचे पथक गेले असताना घडली घटना

पश्चिम बंगालमध्ये तपास यंत्रणांमधील अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर अनेकदा हल्ले होत असतात. पश्चिम बंगालच्या तृणमुल कॉंग्रेसचे नेते शाहजहां शेख यांच्यावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांवरही असाच मोठा हल्ला झाला होता. अशातच या घटनेची पुनरावृत्ती घडली आहे. पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात शनिवार, ६ एप्रिल रोजी सकाळी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पथकावर हल्ला करण्यात आला आहे. भूपितानीनगर भागात झालेल्या हल्ल्यात दहशतवादविरोधी यंत्रणेचा एक अधिकारी जखमी झाला आहे.

माहितीनुसार, एनआयएचे एक पथक भूपितानीनगर येथे झालेल्या स्फोटासंदर्भात छापा टाकण्यासाठी आले होते. शोध मोहिमेदरम्यान अचानक जमावाने पथकावर हल्ला केला. याचा परिणाम म्हणजे एका वाहनाची विंडस्क्रीन तुटली. एनआयएकडून सांगण्यात येत आहे की, या कारवाईबद्दलची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला आधीच माहिती देण्यात आली होती. तरीही योग्य सुरक्षा व्यवस्था त्यांच्याकडून ठेवण्यात आली नाही. एनआयएने मानवेंद्र जाना आणि इतर अज्ञात व्यक्तींविरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दहशतवादविरोधी एजन्सी बॉम्बस्फोट प्रकरणी अटक करण्यासाठी भूपितानीनगर येथे गेली होती.

हे ही वाचा.. 

रामेश्वरम कॅफे स्फोट; भाजप कार्यकर्ता असलेल्या साक्षीदाराला संशयित म्हणून संबोधले; एनआयएकडून वृत्ताचे खंडन

खेकड्यामुळे रोहित पवार अडचणीत

बलुचिस्तानमधून महिन्याभरात २२ जणांचे अपहरण

पाठ्यपुस्तकातून बाबरीचा ‘ढाचा’ हटवून अयोध्येचे राममंदिर!

ईडीच्या पथकावर झाला होता जीवघेणा हल्ला

पश्चिम बंगालच्या तृणमुल कॉंग्रेसचे नेते शाहजहां शेख यांच्या घरावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांवर त्यांच्या सुमारे २०० समर्थकांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. अधिकाऱ्यांनी रेशनिंग वितरण घोटाळ्याच्या चौकशीसाठी ही कारवाई सुरू केली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर तुफान दगडफेक झाल्याने काही अधिकारी जखमी झाले होते. संदेशखाली परिसरात ईडीचे अधिकारी पोहचल्याची खबर लागताच शेख यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत एसआरपीएफ आणि अर्धसैनिक दलाचे जवानही होते. परंतु, जमाव मोठा असल्याने त्याचा फायदा झाला नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version