घरक्राईमनामा२२ व्या मजल्यावरून पडून सुताराचा मृत्यू

२२ व्या मजल्यावरून पडून सुताराचा मृत्यू

कंत्राटदारावर गुन्हा दाखल

मुंबई: वडाळ्यातील एका गगनचुंबी इमारतीच्या २२ व्या मजल्यावरून पडून ३५ वर्षीय सुताराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धर्मेंद्र प्रजापती असे मृत कामगाराचे नाव असून, या प्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत पोलिसांनी कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून वडाळ्यातील ‘मातोश्री’ या एसआरए (SRA) इमारतीत सुताराचे काम करत होता. इमारत सध्या बांधकाम टप्प्यात असून २२ व्या मजल्यावर हॉलचे काम सुरू होते. ६ जुलै रोजी केईएम रुग्णालयातून रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांना एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा ‘ईपीआर’ प्राप्त झाला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता, मृत व्यक्तीची ओळख धर्मेंद्र प्रजापती अशी पटली.
हे ही वाचा:
‘फिलिप्स’च्या आरोग्यसेवा AI सोल्युशनसाठी भारताला पसंती

पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित संशयितांवर छापे; १०० हून अधिक जण ताब्यात

ऑस्ट्रेलियन माध्यमांवर ‘मिस्टर इंडिया’ पंतप्रधान मोदींची छाप

व्हेनेझुएलामधील भूकंपातील मृतांचा आकडा ३,८८९ वर

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे इमारतीचे काम बंद होते. धर्मेंद्रला मद्यपानाचे व्यसन होते आणि तो इमारतीतच राहत होता. १ जुलै रोजी त्याने कंत्राटदाराकडून पगार घेतला होता आणि तो गावी जाण्याच्या तयारीत होता. दरम्यान, ६ जुलै रोजी पहाटे अडीचच्या सुमारास तो इमारतीच्या आवारात गंभीर जखमी अवस्थेत आढळला. एका व्यक्तीने त्याला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यानंतर संपर्क तुटल्याने गोंधळ निर्माण झाला होता.

प्राथमिक तपासात धर्मेंद्र मद्याच्या नशेत असताना २२ व्या मजल्यावरून खाली पडल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी कंत्राटदाराच्या कामातील निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा ठपका ठेवत रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती धर्मेंद्रच्या नातेवाईकांना देण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version