घरक्राईमनामाआयएनएस विक्रांतवर सापडला १९ वर्षीय खलाशाचा मृतदेह; आत्महत्येचा संशय

आयएनएस विक्रांतवर सापडला १९ वर्षीय खलाशाचा मृतदेह; आत्महत्येचा संशय

घटनेच्या चौकशीचे आदेश 

भारताची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतवर नौदलाच्या एका खलाशाचा मृतदेह आढळला आहे. भारतीय नौदलाचा एक १९ वर्षीय खलाशी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवार, २७ जुलै रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. तरुणाने आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

हा तरुण बिहारमधील मुझ्फरनगरमधील असून २०२१ मध्ये तो भारतीय नौदलात रुजू झाला होता. त्यानंतर त्याची पोस्टिंग आयएनएस विक्रांतवर करण्यात आली होती. या तरुणाचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. प्राथमिक अंदाजानुसार तरुणाने आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.

तरुणाच्या मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हा तरुण अग्नीवीर नसून त्याची भरतीप्रक्रिया दरम्यान निवड झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

वंदे भारतवर दगडफेक करणाऱ्यांनी केले ५५ लाखांचे नुकसान

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा फॉर्म्युला ठरला; तीन पक्षांमध्ये ‘अशी’ होणार वाटणी

वाजवा रे वाजवा! आता विवाहसोहळ्यात बॉलीवूड गाण्यांना बंदी नाही

अडीच वर्षांत अडीच दिवसही मंत्रालयात गेले नाहीत ते मोदींना नऊ वर्षांत काय केलं विचारतायत

दरम्यान, एप्रिल महिन्यात क्षेपणास्त्र वाहून नेणाऱ्या आयएनएस ब्रह्मपुत्रावर समुद्रातील एका मोहिमेदरम्यान २३ वर्षीय मोहित नावाच्या एका खलाशाचा मृत्यू झाला होता. ८ एप्रिल रोजी एका अपघातामध्ये गंभीर जखमी होऊन नंतर उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version