घरक्राईमनामामुलुंडमध्ये भरदिवसा रस्त्यात डिलिव्हरी बॉयची हत्या

मुलुंडमध्ये भरदिवसा रस्त्यात डिलिव्हरी बॉयची हत्या

दोन अल्पवयीन आरोपीना अटक 

औषधाची डिलिव्हरी करण्यासाठी निघालेल्या एका तरुणाची भररस्त्यात भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना मुलुंड पश्चिम  डॉ. आंबेडकर क्रॉस रोड येथे सोमवारी दुपारी घडली.

याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी दोघांना अटक केली असून दोघेही आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हि हत्या लुटीच्या उद्देशातून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून अधिक तपास सुरु आहे.

राकेश शुक्ला (१६) असे हत्या करण्यात आलेल्या डिलेव्हरी बॉयचे नाव आहे, राकेश हा मुलुंड पश्चिम येथेच राहणारा असून तेथीलच एका औषधाच्या दुकानात औषधे डिलेव्हरीचे काम करतो. सोमवारी दुपारी  ३ वाजण्याच्या सुमारास राकेश शुक्ला हा सायकलवर औषधाची डिलेव्हरी देण्यासाठी निघाला होता.

डॉ. आंबेडकर क्रॉस रोड या ठिकाणी दुपारी ३ वाजता दोन अल्पवयीन (१६ आणि १७ वयोगटातील ) मुलांनी राकेशला वाटेत अडवले, त्याच्यात काही क्षुल्लक कारणावरून वाद होऊन दोन आरोपीपैकी एकाने राकेशला सोबत असलेल्या चाकूने भोसकून त्याची हत्या केली, त्यानंतर दोघांनी तेथून पळ काढला.

या घटनेची माहिती मिळताच मुलुंड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी राकेश शुक्ल याला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

हे ही वाचा:

संसदेत मोदी गरजले अब की बार ४०० पार…!

ललित कला केंद्राच्या वादात अभिनेते प्रशांत दामलेंनी लक्ष घालून तोडगा काढावा!

हात नका लावू माझ्या दाढीला…

घाटकोपरमध्ये दगडफेक, मुफ्तीच्या द्वेषपूर्ण भाषणप्रकरणी पाच जण ताब्यात!

याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीच्या शोधासाठी तात्काळ दोन पथके तयार करून त्यांचा शोध सुरु केला. काही तासातच मुलुंड पोलिसांनी  मुलुंड चेकनाका येथून दोन अल्पवयीन आरोपीना अटक करण्यात आली.

आरोपींचे वय १६ आणि १७ असून दोघे हे मुलुंड पश्चिम विजय नगर आणि वैशाली नगर परिसरात राहणारे आहेत. या दोघांना हत्येच्या गुन्ह्यात अटक करून त्यांना बालन्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हा हल्ला लुटीच्या इराद्याने झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून या अनुषंगाने चौकशी सुरु असल्याची माहिती पोलीस सूत्रांची दिली आहे. भरदिवसा भररस्त्यात एका डिलिव्हरी बॉयला अडवून दोन अल्पवयीन मुलांनी केलेल्या या हत्येच्या घटनेने मुलुंड मध्ये खळबळ उडवून दिली आहे. या गुन्ह्याचा तपास मुलुंड पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version