घरक्राईमनामामशीद बंदर परिसरातील मिनारा मशिदीजवळ लागली आग

मशीद बंदर परिसरातील मिनारा मशिदीजवळ लागली आग

दुकानांना आग लागली, तूर्तास जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही

मशीद बंदर येथे संध्याकाळी एक आगीची घटना घडली. सोमवारी संध्याकाळी मिनारा मशीद भागात ही आग लागली. अग्निशमन दलाला तशा प्रकारची माहिती च मिळाल्यानंतर लागलीच त्यादिशेने गाड्या धावल्या आणि त्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले.

सुलेमान उस्मान बेकरीच्या समोर असलेल्या या मशिदीच्या जवळ ही आग लागली. तेथील दुकानाला ही आग लागली. त्यात कुणालाही इजा झाल्याचे वृत्त त्यावेळी नव्हते. एका कपड्याच्या दुकानाला ही आग लागल्याचीही माहिती समोर येते आहे. अग्निशमन दलाकडून ही माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा:

श्रीकृष्ण जन्मभूमी-इदगाह वादावर पुन्हा मथुरा कोर्टात सुनावणी

गुजराती बिल्डर चालतो, गृहमंत्री गुजराती नको…

कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपाचे समान नागरी कायद्याचे आश्वासन

देशद्रोह कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली

दरम्यान पुण्यातही आगीची एक घटना घडली. तिथे पुणे सातारा महामार्गाजवळ असलेल्या दुकानांना आग लागली. डीमार्ट जवळ दुपारी २.३० वाजता ही आग लागली होती. त्याठिकाणी अग्निशमन दलाच्या सात गाड्या पोहोचल्या आणि त्यांनी आग विझविली. घरगुती वस्तूंच्या दुकानांना ही आग लागली आणि त्यानंतर ती पसरत गेली. शेजारी असलेल्या मोबाईलच्या दुकानालाही आगीने वेढले. पण नंतर ती आग आटोक्यात आणण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version