घरक्राईमनामामुंबईत बोगस डॉक्टरांचा धुमाकूळ; ५ जणांवर गुन्हे दाखल

मुंबईत बोगस डॉक्टरांचा धुमाकूळ; ५ जणांवर गुन्हे दाखल

मुंबईच्या विविध भागांत वैद्यकीय पदवी नसताना आणि कोणतीही अधिकृत परवानगी नसताना गरिबांच्या जीवाशी खेळणाऱ्या ५ बोगस डॉक्टरांचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईमुळे आरोग्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मुंबई गुन्हे शाखेच्या कक्षा ६ आणि ८ च्या पथकाने महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने झाकीर हुसेन नगर (देवनार) आणि नौपाडा-वांद्रे (पूर्व) या परिसरातील क्लिनिक्सवर अचानक धाडी टाकल्या. या कारवाईत खालील ५ जण रुग्णांवर उपचार करताना आढळले.

सगीर अहमद अब्दुल मजीद हाशमी (वय ३९, ‘डॉ. सगीर क्लिनिक’),अखिलेश कुमार देवेंद्र कुमार दुबे (वय ४७, ‘गायत्री क्लिनिक’), मोहम्मद आलम मोहम्मद शरीफ शेख (वय ३६, ‘आयेशा क्लिनिक’),केशव प्रसाद कुन्नूर पटेल (वय ५६, ‘पटेल क्लिनिक’),मोहम्मद आफ़ताब शौकत खान (वय ५६, ‘आफ़ताब खान क्लिनिक’) असे गुन्हा दाखल झालेल्या बोगस डॉक्टरांची नावे आहेत.

हे आरोपी कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी (Degree) किंवा ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’ची अधिकृत नोंदणी नसताना डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांवर उपचार करत होते. या अनधिकृत उपचार पद्धतीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. गुन्हे शाखेने या छाप्यात १ लाख १९ हजार ३२४ रुपयांचे इंजेक्शन, औषधांच्या बाटल्या, सिरिंज आणि अँटीबायोटिक्स अशा विविध प्रकारचे वैद्यकीय साहित्य जप्त केले आहे.

हे ही वाचा:

सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांना मिळाला दिलासा!

अरुणाचलमध्ये चीनचा नवा कब्जा नाही!

कोथिंबिरीचे भाव कडाडले! किलोचा दर २०० रुपयांच्या पार

स्वातंत्र्यदिनापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी

या प्रकरणातील आरोपींविरुद्ध देवनार आणि निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही धडक कारवाई पूर्ण केली असून, अशा बोगस डॉक्टरांविरोधात पुढील तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version