घरक्राईमनामाभारतात घुसखोरी करणारे 'लष्कर'चे दहशतवादी सुरुंगस्फोटात उडाले!

भारतात घुसखोरी करणारे ‘लष्कर’चे दहशतवादी सुरुंगस्फोटात उडाले!

जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला

जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार पाकिस्तानी दहशतवाद्यांचा भूसुरुंगाच्या स्फोटात मृत्यू झाला. मृतांमध्ये लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा वरिष्ठ कमांडर मोहम्मद फैजान याचाही समावेश आहे. सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी कृष्णा घाटी सेक्टरमधील सत्वल-नाकी परिसरात ही घटना घडली.

माहितीनुसार, पाकिस्तानव्याप्त काश्मीरच्या बाजूने आलेल्या दहशतवाद्यांच्या एका गटाने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी शक्तिशाली भूसुरुंगाचा स्फोट झाला. मात्र, हा स्फोट नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत दहशतवाद्यांची नावे मोहम्मद इश्तियाक, मोहम्मद फैजान, मोहम्मद वकास आणि मोहम्मद आसिम अशी आहेत. हे चौघेही पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील हाजिरा तहसीलच्या मदरपूरमधील मंडला येथील रहिवासी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. फैजान हा लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ कमांडर असल्याची माहिती समोर आली आहे.

सत्वल-नाकी हा नियंत्रण रेषेवरील घुसखोरीच्या प्रयत्नांसाठी वापरला जाणारा परिसर मानला जातो. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी परिसरातील पाळत वाढवली असून, घुसखोरीचे आणखी प्रयत्न होऊ नयेत यासाठी सतर्कता वाढवण्यात आली आहे.

हे ही वाचा:

प्रिय सूर्यकांत, राजीनामा द्या….काँग्रेसने पोस्ट केली डीलिट

गर्भवती महिला पत्रकाराला राहुल गांधींकडून धक्क्बुक्की

‘हिंदूंच्याच दुकानातून बिर्याणी खरेदी करा’ बंगालमध्ये लागले पोस्टर

निवडणूक आयोगाविरोधातील इंडी आघाडीच्या याचिकेत १४ त्रुटी

दरम्यान, पुंछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टरमधील बसोनी परिसरात नियंत्रण रेषेजवळील कुंपणाच्या ठिकाणी २ जुने भूसुरुंग आढळले. रेल्वेमार्गाच्या बांधकामाच्या कामादरम्यान सकाळी ८:२५ आणि दुपारी १२:१० वाजता हे स्फोटक आढळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर लष्कराच्या तज्ज्ञांनी नियंत्रित स्फोट घडवून ते निकामी केले. नियंत्रण रेषेवरील घुसखोरी रोखण्यासाठी काही भागांत भूसुरुंग तैनात करण्यात आले आहेत. मात्र, मुसळधार पाऊस आणि जमिनीची धूप यांमुळे जुने भूसुरुंग त्यांच्या मूळ जागेवरून सरकून जमिनीवर येऊ शकतात. त्यामुळे सुरक्षा दलांसह स्थानिक नागरिकांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version