घरक्राईमनामाआता चेंबूरलाही झाला बलात्कार; शस्त्राचा धाक दाखवून केला अत्याचार

आता चेंबूरलाही झाला बलात्कार; शस्त्राचा धाक दाखवून केला अत्याचार

साकीनाका येथील बलात्काराची घटनेला १५ दिवस उलटत नाही तोच चेंबूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्काराची धक्कादायक घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. मित्रांसोबत मारिन ड्राईव्ह येथून येणाऱ्या २० वर्षीय तरुणीवर एकाने शस्त्राचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

चेंबूर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून एकाला अटक केली असल्याची माहिती परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली. या घटनेने पुन्हा एकदा मुंबईत महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही २० वर्षाची असून चेंबूर वसाहत या ठिकाणी राहण्यास आहे. शुक्रवारी रात्री ती काही मित्रांसोबत मरीन ड्राईव्ह येथे फिरण्यासाठी गेली होती. शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी आणि तिचा एक मित्र चेंबूर येथ घरी परतत असताना चेंबूर कॅम्प येथे पाठीमागून आलेल्या एकाने पीडित तरुणीच्या मित्राला शस्त्राचा धाक दाखवून पळवून लावले. त्यानंतर पीडित तरुणीला शस्त्राचा धाक दाखवत एका निर्जन ठिकाणी घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार करून तेथून पोबारा केला.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारला ‘घोळ’ सरकार म्हणायचे का?

कशी असते जर्मन निवडणूक, कोण होणार नवीन जर्मन चांसेलर?

उत्तर प्रदेशमधील चितांचे फोटो दाखविणाऱ्यांचे ‘सफेद झूठ’ झाले उघड

महिला पोलिस आता ‘आठ तास’ ड्युटीवर

पीडित तरुणीच्या मित्राने चेंबूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी तक्रार दाखल करताच चेंबूर पोलिसांनी ताबडतोब पीडित मुलीला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करून बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असल्याची माहिती परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपाचे नाव धीरज राजकुमार सिंग (२४) असे असून आरोपी हा तरुणीच्या ओळखीचा असल्याचे समजते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version