घरक्राईमनामातेल टँकर मधून गोतस्करी, २० गायींची सुटका, चालक फरार!

तेल टँकर मधून गोतस्करी, २० गायींची सुटका, चालक फरार!

जम्मू आणि काश्मीर पोलिसांची कारवाई 

जम्मू-कश्मीर पोलिसांनी ग्रनाई परिसरात गोवंश तस्करीसाठी वापरण्यात आलेला एक सुधारित (modified) ऑइल टँकर जप्त केला आहे. या वाहनामध्ये २० पेक्षा अधिक गायींना लपवून ठेवण्यात आले होते. उधमपूरचे उपअधीक्षक (मुख्यालय) प्रल्हाद शर्मा यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, “गोवंश तस्करीबाबत माहिती मिळाल्यानंतर आम्ही नाक्यावर एका वाहनाला थांबण्याचा इशारा दिला. मात्र, संबंधित वाहनाने न थांबता पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. येथे आल्यावर चालकाने वाहन सोडून पळ काढला.”

तपासादरम्यान पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता, वाहनाच्या आत खास तयार केलेल्या पोकळीत जनावरे लपवून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी सांगितले की, वाहनामध्ये २० हून अधिक जनावरे आढळून आली. सर्व गोवंशीय जनावरांची सुरक्षित सुटका करण्यात आली असून, तस्करीप्रकरणी संबंधित आरोपींचा शोध सुरू आहे. उधमपूर पोलिसांकडून या प्रकारांवर कारवाई करण्यासाठी सतत मोहीम राबवली जात आहे, असेही अधिकारी शर्मा यांनी सांगितले.

याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. तेल टँकरमधून सर्व गायींची सुटका करण्यात आली आहे. वाहनाचा चालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version