घरक्राईमनामाकरुणा शर्मा यांचा जामीन अर्ज फेटाळला

करुणा शर्मा यांचा जामीन अर्ज फेटाळला

अंबाजोगाई सत्र न्यायालयातील करुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर पडली आहे. जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. मात्र, करुणा शर्मा यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर मंगळवारी अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांकडून लेखी बाजू मांडली नाही. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी १८ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता करुणा शर्मा यांना आणखी काही काळ न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे.

करुणा शर्मा बीडमध्ये असताना त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आले होते. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. ६ सप्टेंबरला पोलिसांनी करुण शर्मा यांना न्यायालयात हजर केले होते. तेव्हा न्यायालयाने करुणा शर्मा यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. तसेच त्यांच्या ड्रायव्हरला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे न्यायालय आज करुणा शर्मा यांना जामीन देणार किंवा नाही, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर न्यायालयाने त्यांना जामीन नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.

या सुनावणीवेळी तपास अधिकारी आणि फिर्यादी गैरहजर होते. त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलावी लागली. त्यामुळे करुणा शर्मा यांच्या वकिलाने पोलीस याप्रकरणात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. आता १८ सप्टेंबरला करुणा शर्मा यांना जामीन मिळणार की नाही, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

हे ही वाचा:

स्वतःच्या बुडा खाली काय जळते आहे ते आधी बघा

अमेरिकेकडून तालिबानला ४४० कोटी रुपयांची मदत

खडकवासला धरण १००% भरले

रशियात घुसखोरीसाठी जिहादी सज्ज

शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आलं होतं. त्यामुळे शर्मा यांच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल दुपारी शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आली होती. तसेच शर्मा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यता आलं.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version