घरक्राईमनामालॉरेन्स बिश्नोईच्या माणसाची खोटी माहिती देणाऱ्याला अटक

लॉरेन्स बिश्नोईच्या माणसाची खोटी माहिती देणाऱ्याला अटक

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला केला होता फोन

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराचा संबंध कुख्यात लॉरेन्स बिष्णोई टोळीशी असल्याचे समोर आले आहे. अशातच मुंबई पोलिसांना आलेल्या एका फोनमुळे मोठी खळबळ उडाली आहे. सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच दादर रेल्वे स्थानाकावर कुख्यात लॉरेन्स बिष्णोई टोळीतील गुंड येणार असल्याचा एक दूरध्वनी मुंबई पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. सुरक्षा यंत्रणा सज्ज करण्यात आल्या. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कॉल करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षामध्ये शुक्रवार, १९ एप्रिल रोजी मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीने दूरध्वनी केला होता. लॉरेन्स बिष्णोई टोळीचा गुंड दादर रेल्वे स्थानकात सकाळी १० वाजता येणार असून त्याने लाल रंगाचा शर्ट परिधान केलेला असेल, असे दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. तसेच मुंबईत तो घातपात करणार असल्याचेही त्याने सांगितले. हे बोलून त्याने तात्काळ दूरध्वनी बंद केला. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा त्याला दूरध्वनी केला असता त्याने फोन उचलला नाही. काही काळानंतर त्याने फोन बंद केला.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दादर रेल्वे पोलीस, दादर पोलीस, शिवाजी पार्क पोलीस, भोईवाडा पोलीस यांना दूरध्वनीबाबतची माहिती देऊन सतर्क राहण्याची सूचना करण्यात आली. पण तपासणीत तसे काहीही आढळले नाही. दरम्यान, लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कॉल करणाऱ्याला अटक केली आहे. दारूच्या नशेत कॉल केल्याचा पोलिसांना संशय असून पुढील तपासणी सुरू आहे.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे पहिल्या दिवसापासून खोटे बोलत होते, हे सिद्ध झाले!

मध्य प्रदेश: निवडणूक बंदोबस्ताचे काम आटोपून परतणाऱ्या होमगार्ड्सच्या बसला अपघात

एकमेकांना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे ४ जूननंतर एकमेकांचे कपडे फाडतील!

मोदीस्तुती करणारे गाणे गाणाऱ्या युट्युबरवर मुस्लिम तरुणांचा हल्ला

यापूर्वी सलमानच्या घराजवळ लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने टॅक्सीची नोंदणी केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील २० वर्षीय तरूणाला वांद्रे पोलिसांनी अटक केली होती. रोहित त्यागी (२०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील गाझीयाबाद येथील रहिवासी आहे. त्याने गुंड लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने अभिनेता सलमान खानचे घर असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंट येथून वांद्रे येथे जाण्यासाठी खासगी टॅक्सीची नोंदणी केली होती. याप्रकरणी आरोपी तरूणाला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. केवळ मस्करी करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचे त्याचे चौकशीत सांगितले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version