घरक्राईमनामागुरुग्राममध्ये मॉडेलची हत्या, बीएमडब्ल्यूमध्ये मृतदेह घालून आरोपी पळाले!

गुरुग्राममध्ये मॉडेलची हत्या, बीएमडब्ल्यूमध्ये मृतदेह घालून आरोपी पळाले!

गँगस्टर हत्येप्रकरणी साक्षीदार होती तरुणी

गुरुग्राममधील एका हॉटेलमध्ये २७ वर्षीय तरुणीची संशयास्पदरित्या हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दिव्या पाहूजा असे मृत महिलेचे नाव असून ती मॉडेलिंग करत असे.या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.धक्कादायक बाब म्हणजे हत्या करणाऱ्या आरोपीने तरुणीचा मृतदेह बीएमडब्ल्यू कारमध्ये घालून नेला आहे.दिव्या पाहूजा ही गुंड संदीप गडोली एन्काऊंटर प्रकरणातील मुख्य साक्षीदार होती.

मॉडेल दिव्या पाहुजा ही गुरुग्राममधील बलदेव नगर येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.ज्या हॉटेलमध्ये तिची हत्या झाली त्या हॉटेलचे मालक अभिजित आणि त्याच्या साथीदारांनी दिव्याची हत्या केल्याचा आरोप आहे.मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने साथीदारांना १० लाख रुपये दिले आहेत.यानंतर आरोपी अभिजितच्या दोन साथीदारांनी अभिजीतच्या निळ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू कारच्या डिक्कीमध्ये मृतदेह टाकून घटनास्थळावरून पळ काढला.ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.पोलीस आरोपी अभिजित आणि त्याच्या कारचा शोध घेत आहेत.

हे ही वाचा:

महालक्ष्मी रेसकोर्सवर डोळा नेमका कोणाचा?

कुनो नॅशनल पार्कमध्ये मादी चित्ता आशाने ३ शावकांना दिला जन्म!

‘पीएपी’ मधील ‘प्रसाद’ पवारांनाही मिळाला!

केपटाऊनच्या मैदानात ‘राम सिया राम’ गाणं वाजताच विराट कोहलीने जोडले हात

मिळालेल्या माहितीनुसार, २ जानेवारीला पहाटे ४.१८ वाजता आरोपी अभिजित हा एक तरुणी आणि अन्य एका व्यक्तीसोबत हॉटेलच्या रिसेप्शनवर पोहचला होता.तेथून तिघेही रूम क्रमांक १११ मध्ये गेले.त्यानंतर २ जानेवारी रोजी रात्री १०.४४ वाजता अभिजित आणि इतर आरोपी मृत दिव्याचा मृतदेह चादरीत गुंडाळून ओढून नेताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत. दिव्याच्या कुटुंबियांच्या तक्रारीच्या आधारे गुरुग्राम पोलिसांनी हॉटेल मालक अभिजित सिंह आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version