घरक्राईमनामाफेसबुकवर 'रशियन' तरुणीची मैत्री पडली महागात

फेसबुकवर ‘रशियन’ तरुणीची मैत्री पडली महागात

कस्टम क्लिअरन्सच्या बहाण्याने ७.३८ लाखांचा गंडा

सोशल मीडियावरील मैत्री किती महागात पडू शकते, याचे आणखी एक धक्कादायक उदाहरण पालघर जिल्ह्यातील नालासोपाऱ्यात समोर आले आहे. फेसबुकवर स्वतःला रशियन तरुणी असल्याचे भासवत एका सायबर भामट्याने ५६ वर्षीय व्यक्तीचा विश्वास संपादन केला आणि दिल्ली विमानतळावर कस्टम विभागाने अडवल्याचा बनाव रचत तब्बल ७ लाख ३८ हजार ५०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आणि सायबर विभागाकडून तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारी रोजी तक्रारदाराला फेसबुकवर एका महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यानंतर दोघांमध्ये नियमित संवाद सुरू झाला. काही दिवसांनी संबंधित महिलेने आपण रशियाहून भारतात आल्याचे सांगितले. दिल्ली विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी मौल्यवान वस्तू आणि परकीय चलन असल्याच्या कारणावरून आपल्याला अडवले असून सुटका करून घेण्यासाठी तातडीने पैशांची गरज असल्याचा दावा तिने केला. पैसे परत करण्याचे आश्वासन देत तिने विविध कारणे सांगून तक्रारदाराकडून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने ७ लाख ३८ हजार ५०० रुपये जमा करून घेतले.
हे ही वाचा:
कुणाल कामरा व प्रकाश राज यांच्यावर गुन्हा दाखल करा !

अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयावरील पाडकामाला स्थगिती

स्वित्झर्लंडमध्ये बसमधून उतरून चालकाने पढला नमाज, प्रवासी राहिले ताटकळत

जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा कहर; १० मृत्यू, राजौरीत पूरस्थिती

रक्कम मिळाल्यानंतर महिलेने अचानक संपर्क तोडला. फोन बंद झाला आणि सोशल मीडिया खातेदेखील निष्क्रिय करण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित व्यक्तीने वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून बँक व्यवहार, मोबाईल क्रमांक आणि इतर डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे. तसेच सोशल मीडियावरून होणाऱ्या अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आणि अनोळखी व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत पैसे पाठवू नयेत, असे आवाहनही पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version