घरक्राईमनामाएआय तंत्रज्ञानाचा वापर करून शेजारच्या महिलेला घातला सात लाखांचा गंडा

एआय तंत्रज्ञानाचा वापर करून शेजारच्या महिलेला घातला सात लाखांचा गंडा

एआय व्हॉईस स्कॅमचा वापर करून केली फसवणूक

ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असून आता हे चोरटे एआय तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सायबर फसवणुकीचं एक नवं प्रकरण समोर आलं असून या प्रकरणात महिलेची तब्बल सात लाखांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. पीडित महिला मुंबईतील असून ती नोकरीच्या शोधात होती. याचा फायदा घेत एआय व्हॉईस स्कॅमचा वापर करून तिची फसवणूक झाली आहे. या घटनेप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून महिलेचा आरोपी पती सध्या फरार आहे.

पीडित ३४ वर्षीय महिला विधवा असून ती गेल्या अनेक दिवसांपासून चांगल्या नोकरीच्या शोधात होती. ही गोष्ट या महिलेने तिची शेजारी रश्मी कार हिला सांगितली. दरम्यान, पीडित महिलेला अभिमन्यू मेहरा या नावे संपर्क करण्यात आला आणि रश्मी कार हिने नंबर दिल्याची बतावणी करण्यात आली. शिवाय नोकरी शोधण्यास मदत करण्याचे आश्वासनही देण्यात आले. यानंतर पीडित महिला आणि मेहरानं चॅटिंग सुरू केलं. यानंतर दोघंही रिलेशनशिपमध्ये आले, तरीही पीडिता महिला मेहराला भेटलेली नव्हती. यावेळी पीडितेनं आरोपीच्या बँक खात्यात सुमारे सात लाख रुपये ट्रान्सफर केले.

हेही वाचा..

“दीदींचे पश्चिम बंगाल महिलांसाठी असुरक्षित”

धर्मवीर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

प. बंगालमध्ये विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून जोडप्याला मारहाण करणाऱ्या टीएमसी नेत्याला अटक

… म्हणून टी-२० विश्वचषक जिंकणारा भारतीय संघ अजूनही बार्बाडोसमध्येच

पीडितेनं पोलिसांना सांगितलं की, ती नेहमी मेहराला भेटण्याचा प्रयत्न करत असे, मात्र तो नेहमी बोलणं टाळत असे. मेहरा यांनी पीडित महिलेला ब्लँकेटही भेट दिली होती. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यानंतर पीडितेला संशय आल्यानं तिनं पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. तपासादरम्यान, पोलिसांनी पीडित महिलेच्या शेजारणीला म्हणेजच रश्मी कार हिला अटक केली. तपासादरम्यान रश्मी कारनं कबूल केलं की, ती एक एआय तंत्रज्ञान असलेला ऍप वापरत होती. ज्याच्या मदतीनं ती तिचा आवाज बदलून पीडितेशी बोलायची. यासाठी तिने एक वेगळा फोन नंबर वापरला. रश्मीच्या पतीला या प्रकरणाची माहिती होती आणि त्याने हे प्रकरण थांबवण्याऐवजी बायकोला आणखी प्रोत्साहन दिले. दरम्यान, आरोपी महिलेचा पती फरार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version